Rohit Sharma and Virat Kohli ODI return delayed : भारतीय क्रिकेट संघाचा पुढच्या महिन्यात होणारा बांगलादेश दौरा रद्द झाला आहे. या दौऱ्यात भारताला 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळायचे होते. परंतु, काही राजकीय कारणांमुळे हा दौरा रद्द करण्यात आला. या दौऱ्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानं टीम इंडियाला श्रीलंकेत (IND vs SL series) येऊन मालिका खेळण्याची ऑफर दिली. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने हा प्रस्तावही नाकारला आहे.
विराट आणि रोहितसाठी प्रतीक्षा वाढणार!
जर श्रीलंकेविरुद्धची ही मालिका झाली नाही, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी थांबावं लागणार आहे. कारण दोघांनीही टेस्ट आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते फक्त वनडे सामन्यांमध्येच खेळणार आहेत.
सध्या भारत-इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड सध्या याच मालिकेकडे लक्ष देत आहे. श्रीलंका क्रिकेटमधील एका अधिकाऱ्याने मात्र सांगितलं आहे की, बीसीसीआयकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण 'स्पोर्ट्स तक'च्या रिपोर्टनुसार, एका बीसीसीआय सूत्राने सांगितलं की श्रीलंकेविरुद्ध मालिका होण्याची शक्यता फारच कमी आहे.
पुढची संधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शेवटचा वनडे सामना 9 मार्च 2025 रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळला होता. त्यानंतर भारतीय संघाने एकही वनडे सामना खेळलेला नाही. आता जर श्रीलंका आणि बांगलादेश दौरे रद्दच राहिले, तर या दोघांना पुढील वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन-तीन सामन्यांच्या मालिकेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण रोहित-विराट मैदानात केव्हा दिसतील याचा आता फक्त अंदाजच आहे. बीसीसीआयचा निर्णय पाहूनच पुढचं स्पष्ट होईल.
हे ही वाचा -