T20 World Cup 2021: युएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) आजपासून टी -20 विश्वचषक (T20 World Cup 2021) सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयाबाबत मोठे विधान केले आहे. गांगुलीचा असा विश्वास आहे की कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडिया या वर्षी या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते. त्याने असेही म्हटले की इतकी प्रतिभा असूनही संघाला ही ट्रॉफी जिंकण्यासाठी परिपक्वतेसह आपला खेळ खेळावा लागेल.


टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली शनिवारी म्हणाले, की "तुम्ही इतक्या सहजपणे चॅम्पियन होत नाही. केवळ स्पर्धेत भाग घेतला म्हणजे विजेता होता येत नाही, त्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेतून जावे लागेल. स्पर्धेत परिपक्वतेने खेळण्याची गरज आहे. " त्याचवेळी ते म्हणाले, "तुम्ही टीम इंडियावर नजर टाकली तर तुम्हाला दिसेल की इथं खूप जागतिक दर्जाची प्रतिभा आहे. या खेळाडूंमध्ये कोणत्याही स्तरावर खेळताना धावा आणि विकेट घेण्याची क्षमता असते. हा विश्वचषक जिंकण्यासाठी त्यांना फक्त मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. ”


एका वेळी एका खेळावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक
दादा म्हणून प्रसिद्ध असलेले गांगुली म्हणाले की, "टीम इंडियाने सुरुवातीपासूनच जेतेपदाचा विचार करू नये, तर एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अंतिम फेरी गाठल्यावरच तुम्ही विजेतेपद जिंकता. यासाठी तुम्हाला लीग फेरीत भरपूर क्रिकेट खेळावे लागेल. म्हणूनच माझा विश्वास आहे की सध्या टीम इंडियाने एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.


पुढील वर्षी भारतात आयपीएलचे आयोजन अपेक्षित आहे
सौरव गांगुली यांनीही पुढील वर्षी आयपीएल भारतातच खेळण्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "आयपीएल ही आमची स्पर्धा आहे आणि मला मनापासून आशा आहे की पुढच्या वर्षी ती पुन्हा एकदा भारतात खेळली जाईल. दुबईत स्पर्धेदरम्यान खूप छान वातावरण पहायला मिळालं असेल. पण भारतात आयपीएलची आवड खूप वेगळी आहे. आम्हाला पुन्हा एकदा भारतात स्पर्धा आयोजित झालेलं पहायचं आहे.


मला मनापासून आशा आहे की पुढील सात ते आठ महिन्यांत भारतातील कोविड -19 साथीची परिस्थिती सामान्य होईल आणि आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये आयपीएल सामने आयोजित करू शकू.


आयपीएलची सुरुवात यावर्षी भारतात झाली होती. मात्र, कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान, बायो बबलमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर त्याचा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला गेला.