मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयच्या पुढील पाच वर्षांच्या मीडिया राइट्ससाठी आज लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये रिलायन्स कंपनीने बाजी मारली आहे. टीम इंडियाच्या मायदेशातील सर्व सामन्याचे अधिकार आता रिलायन्स समुहाची कंपनी वायकॉम 18 ला मिळाले आहेत. सप्टेंबर 2023 ते मार्च 2028 पर्यंत बीसीसीआयच्या मीडिया राइट्ससाठी आज लिलाव झाला. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, वायकॉम 18 ने सर्वांना पछाडत मीडिया राइट्स मिळवले आहेत. डिज्नी हॉटस्टार, सोनी पिक्चर्स नेटवर्क यांनीही बोली लावली होती, पण अखेरीस वायकॉम 18 ने बाजी मारली. 


वायकॉम 18 ला पुढील पाच वर्षांत भारताच्या मायदेशात होणाऱ्या 88 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या प्रेक्षपण करण्याचे अधिकार मिळाले आहे. यासाठी वायकॉम 18 बीसीसीआयला 5966.4 कोटी रुपये देणार आहे. 2024 ते 2027 पर्यंत होणाऱ्या आयसीसीच्या सर्व स्पर्धेचे टिव्हीचे अधिकार ZEE/Sony कंपनीला मिळाले आहेत. तर डिजिटल राइट्स हॉटस्टारला मिळालेत. 2023 ते 2028 पर्यंतचे आयपीएलचे टिव्ही राइट्स स्टार स्पोर्ट्सकडे असतील तर डिजिटल राइट जिओ सिनेमाकडे आहेत. 


बीसीसीआय मीडिया अधिकार पॅकेज
पॅकेज ए : टिव्ही अधिकार - प्रति सामना 20 कोटी रुपया (भारतीय उपखंड)
पॅकेज बी : डिजिटल अधिकार - प्रति सामना 25 कोटी रुपये (भारत आणि इतर देश)


2018 मध्ये डिज्नी हॉटस्टारने प्रति सामना 60 कोटी रुपयांच्या हिशोबाने मीडिया राइट्स मिळवले होते. पण यावेळी टेंडरसाठी कंपन्यांनी रस न दाखवल्यामुळे प्रति सामना किंमत कमी केली होती. यंदा प्रति सामना 45 कोटी इतके शुल्क ठेवली होती. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत झालेल्या हाय प्रोफाइल सामन्यांना पाहता मोठी बोली लागेल, अशी बीसीसीआयला आशा होती. पुढील पाच 5 वर्षांत भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरोधात 39 सामने खेळणार आहे.  










आज झालेल्या लिलावात रिलायन्स कंपनीच्या वायकॉमने बाजी मारली आहे. वायकॉम 18 ने टीम इंडियाच्या होम सामन्याचे दोन्ही अधिकार मिळवले आहेत. टिव्ही आणि डिजिटलर राइट्स पुढील पाच वर्ष आता वायकॉम 18 कडे राहणार आहेत. त्यामुळे पुढील काही वर्ष आता वायकॉम 18 च्या स्पोर्ट्स 18 या टिव्ही चॅनलवर भारताचे सामने पाहता येतील. तर जिओ सिनेमा अॅपवरही सामन्याचा आनंद घेता येईल. गेल्या काही वर्षांपासून हॉटस्टारने क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण यंदाच्या आयपीएलमध्ये जिओकूडन त्यांना टक्कर मिळाली होती. आता यापुढे भारताचे मायदेशात होणारे सर्व सामने स्पोर्ट 18 आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळतील.  


आणखी वाचा :


वर्ल्ड कप, आशिया चषक पाहा फुकटात, अॅपच्या स्पर्धेत चाहत्यांचा फायदा