BCCI: भारताला (India) स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण (Independence Day 2022) झाली असून स्वातंत्र्याचा अमृतोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा (Indian Flag) फडकावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (Board of Control for Cricket in India) भारताच्या 75वा स्वातंत्र्यदिवस जबरदस्त जर्सी (New Jersey) लॉन्च केलीय. क्रिकेटप्रेमींना ही जर्सी बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन खरेदी करता येणार आहे. यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे. 


भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बीसीसीआयनं नुकतंच एक ट्वीट केलंय. ज्यात भारताच्या 75वा स्वातंत्र्यदिवसानिमित्त लॉन्च करण्यात आलेल्या जर्सीचा एक फोटो शेअर केलाय. या जर्सीवर 75 या आकड्याची ठिकठिकाणी वेगळ्या अंदाजात प्रिंटिग करण्यात आलीय. तर, एका बाजून तिरंग्याची लकीर दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, प्रेक्षकांना ही जर्सी खरेदी करण्यासाठी बीसीसीआयच्या अधिकृत बेवसाईटवर भेद द्यावी लागेल.


बीसीसीआयचं ट्वीट-



भारतीय संघ झिम्बाव्वे दौऱ्यावर 
भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयनं नुकतंच झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबमधील भारतीय खेळाडूंचे फोटो शेअर केले होते. ज्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चहर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांसह अनेक खेळाडू सराव करत आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेला येत्या 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 


सहा वर्षानंतर भारताचा झिम्बाब्वे दौरा
दरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. 


झिम्बाब्वे दौऱ्यातील भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.


हे देखील वाचा-