नवी दिल्ली : डीजीसीए आणि नागरी उड्डान मंत्रालयाने मैदानावरुल ड्रोनद्वारे क्रिकेट सामन्याचे चित्रीकरण करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सशर्त मान्यता दिली आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाला बीसीसीआय व क्विडिककडून थेट प्रक्षेपणासंदर्भात रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीमच्या (आरपीएएस) मंजुरी व वापरासाठी विनंती प्राप्त झाली होती.
नागरी उड्डाण मंत्रालय (एमओसीए) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे महासंचालक (डीजीसीए) यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सन 2021 मध्ये भारतीय क्रिकेट हंगामाच्या थेट हवाई छायाचित्रणासाठी ड्रोन तैनात करायला सशर्त परवानगी दिली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाला बीसीसीआय व मेसर्स क्विडिककडून थेट हवाई छायाचित्रणासाठी रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात विनंती झाली होती.
नागरी उड्डाण मंत्रालयाचे सहसचिव अंबर दुबे म्हणाले, ड्रोन संकल्पना आपल्या देशात वेगाने विकसित होत आहे. याचा उपयोग कृषी, खाणकाम, आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन ते क्रीडा व करमणुकीपर्यंत विस्तारत आहे. देशातील ड्रोनच्या व्यावसायिक वापराला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या उद्देशाच्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली आहे. ड्रोन नियम 2021 हे कायदा मंत्रालयाशी चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही मार्च 2021 पर्यंत ते मंजूर होण्याची अपेक्षा करीत आहोत, असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या