IND vs ENG 1st Test highlights इंग्लंडच्या संघानं दिलेलं 420 धावांचं आव्हान स्वीकारत भारतीय संघ मैदानात उतरला. पण, सलामीवीरांची जोडी खेळपट्टीवर स्थिरावण्याआधीच संघाला पहिला धक्का मिळाला. चौथ्या दिवसअखेर नुकत्याच फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाच्या खात्यात 39 धावांची नोंद झाली.


चौथ्या दिवशी आर. अश्विनच्या गोलंदाजीपुढं चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी 178 धावांवर गारद केलं. पहिल्या खेळीत इंग्लंडनं 578 धावा केल्या होत्या, तर भारतीय संघानं 337. भारतीय संघाला सर्वबाद करत इंग्लंडनं 241 धावांची आघाडी आपल्याकडे ठेवली. ज्यानंतर पुन्हा फलंदाजीसाठी येत यात भर टाकत भारतीय संघाला कसोटी विजयासाठी 420 धावांचं आव्हान दिलं.


अश्विनची कमाल...


एकिकडे इंग्लंड पुन्हा एकदा धावांचा डोंगर उभारणार अशी भीकी असतानाच भारतीय बाजूनं आर. अश्विननं मात्र आक्रमक गोलंदाजीचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. पाहुण्या संघातील महत्त्वाच्या फलंदाजांना त्यानं माघारी धाडलं.


अश्विननं रोरी बर्न्स, डॉमनिक सिब्ले, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन यांना शिकार केलं. कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यानं 28व्या वेळेस पाचपेक्षाही जास्त गडी बाद करण्याची कमाल केली. शिवाय कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक पाच गडी बाद करणारा तो जगातील आठवा गोलंदाज ठरला आहे.


राज ठाकरेंना सध्या प्रसिद्धीची गरज; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा टोला


दरम्यान, गोलंदाजीच्या बाबतीत चौथ्या दिवशी भारतानं दिलासादायक कामगिरी केलेली असताना आता संघाला विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 420 धावाचं लक्ष्य गाठण्याची. पाचव्या दिवशी एकूण 90 षटकांचा खेळ होणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या तीन निष्कर्ष लावण्यात येत आहेत. जिथं विजयी पताका यजमान किंवा पाहुणा संघ उंचावेल किंवा मग हा सामना अनिर्णित म्हणून घोषित करण्यात येईल. तेव्हा आता नेमकी ही आकडेवारी आणि खेळाडूंचं प्रदर्शन कोणते परिणाम क्रीडारसिकांपुढे मांडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.