IPL 2025 CSK Retained Players List 2025 : एमएस धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणार का? हा प्रश्न गेल्या अनेक आठवड्यांपासून सतत विचारला जात होता पण आता त्याला पुष्टी मिळाली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी दिग्गज कर्णधार धोनी पुढच्या हंगामातही 'यलो जर्सी'मध्ये खेळणार आहे. धोनीने स्वतः याची घोषणा केली असून आता एका रिपोर्टनुसार चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही याला दुजोरा दिला आहे. आयपीएलच्या सलग 18 व्या हंगामात धोनी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या कायम ठेवण्याच्या यादीबाबत एका मीडिया रिपोर्टमध्ये एक मोठे अपडेट समोर आला आहे.


क्रिकबझच्या वृत्तानुसार, एमएस धोनी व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2025 साठी कर्णधार ऋतुराज गायकवाड, फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना यांना कायम ठेवणार आहे. धोनी, गायकवाड, जडेजा आणि पाथीराना व्यतिरिक्त चेन्नई डेव्हॉन कॉन्वे, समीर रिझवी आणि शिवम दुबे यांच्यापैकी कोणतेही दोन खेळाडू कायम ठेवेल.


आयपीएलच्या नव्या नियमांनुसार आता सर्व संघ पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार आहेत. लिलावात RTM अंतर्गत सहाव्या खेळाडूचा संघात समावेश केला जाऊ शकतो. संघाला हवे असल्यास ते यापेक्षा कमी खेळाडूंना कायम ठेवू शकतात. जर एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम ठेवले तर त्याच्या पर्समध्ये 75 कोटी रुपयांची घट होईल.




रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्ज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला 18 कोटी रुपयांमध्ये घेणार आहे. म्हणजेच जडेजा चेन्नईचा नंबर-1 कायम राहणार आहे. याशिवाय कर्णधार ऋतुराज गायकवाडला 14 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात येणार आहे. संघ श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवणार आहे. तर माजी कर्णधार एमएस धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात येईल.




आयपीएल 2025 लिलाव कधी होणार?


तुमच्या माहितीसाठी, यावेळी एक मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही आयपीएलचा लिलाव परदेशात होऊ शकतो. यापूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की आयपीएल 2025 चा मेगा लिलाव सौदीमध्ये होऊ शकतो. क्रिकबझच्या अहवालात असे म्हटले आहे की मेगा लिलावासाठी सिंगापूरचाही विचार केला जात आहे. सध्या, स्थळाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आयपीएल 2025 चा लिलाव 24 किंवा 25 नोव्हेंबरला होऊ शकतो.


हे ही वाचा -


Virat Kohli Viral Video : कोहलीचा संयम सुटला; दुसऱ्या कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर केली तोडफोड; UNSEEN व्हिडिओ व्हायरल