BCCI Central Contract 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतीच महिला क्रिकेटपटूंची (BCCI Contract List Women) केंद्रीय करार यादी जाहीर केली. पुरुष संघाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु घोषणा होण्यापूर्वीच विविध अटकळ सुरू झाली आहेत. महिला क्रिकेटपटूंच्या यादीत 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, तर पुरुष क्रिकेटपटूंच्या जुन्या यादीत 30 खेळाडूंची नावे होती. दरम्यान, बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.




वृत्तानुसार, राष्ट्रीय निवड समितीकडून केंद्रीय करारांची (BCCI Central Contract 2025) यादी तयार केली जात आहे. यादी तयार करण्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांचा सल्लाही घेतला जात आहे. सध्या रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांची नावे A+ श्रेणीमध्ये आहेत. परंतु नवीन अपडेटनुसार, बोर्डाचे सर्व सदस्य सध्या A+ श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना कायम ठेवण्याच्या बाजूने नाहीत. ज्यामुळे ज्यावरून त्याच्यात मतभेद असल्याचे दिसत आहे.




A+ श्रेणीमध्ये निवड कशी केली जाते? 


तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये काही प्रमुख खेळाडूंना A+ श्रेणीमध्ये स्थान दिले जाते. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे कदाचित म्हणूनच त्यांना A+ श्रेणीत स्थान मिळण्याबाबत शंका आहे. पण बीसीसीआयमधील एका प्रभावशाली व्यक्तीचे मत आहे की ही यादी सध्या आहे तशीच ठेवावी.


अश्विन बाहेर, अक्षर पटेलला मिळणार प्रमोशन...


रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे त्याला बीसीसीआयच्या करार यादीतून वगळण्यात येईल. त्याच वेळी, अलीकडेच भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त झालेला अक्षर पटेल याला ब श्रेणीतून अ श्रेणीत बढती दिली जाऊ शकते. श्रेयस अय्यरने या हंगामात 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्याचे केंद्रीय करार यादीत पुनरागमन जवळजवळ निश्चित आहे.


हे ही वाचा :


Rishabh Pant and Sanjiv Goenka : ऋषभ पंतच्या 'त्या' चुकीमुळे हरली लखनौ? मालक संजीव गोएंका मैदानात आले अन्..., VIDEO