Tamim Iqbal acid attack in 2017 : बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू तमिम इक्बाल या क्रिकेट खेळत असताना भर मैदानात ह्रदय विकाराचा झटका आलाय. शिवाय त्याला एक नाही तर दोन ह्रदयविकाराचे झटके आले आहेत. पहिला धक्का सौम्य होता. मात्र, त्याला आलेला दुसरा ह्रदयविकाराचा धक्का हा तीव्र होता. त्यामुळे सर्वांनी चिंता व्यक्त केलीये. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे तमीम इक्बाल ढाका प्रिमिअर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये खेळत होता. त्यावेळी त्याला ह्रदयविकाराचा झटका आलाय. दरम्यान, 2017 मध्ये तमीम इक्बालवर अॅसिड हल्ला झाला होता. त्यामुळे त्याने कौंटी क्लब सोडण्याचा निर्णय घेतला होता. 


2017 मध्ये तमीम इक्बालवर अॅसिड हल्ला 


बांगलादेशचा धडाकेबाज सलामीवीर तमीम इकबाल याने 2017 मध्ये एसेक्स कौंटी क्लब सोडण्याचा निर्णय घेतला होता. तमीम इकबालने त्याच्यावर  अॅसिड हल्ला (Tamim Iqbal acid attack in 2017 ) झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे आपण कौंटी क्लब सोडत असल्याचं त्याने म्हटलं होतं. एसेक्स कौंटी क्लबकडून खेळणाऱ्या तमीमने टी 20 कौंटी चॅम्पियनशिपमध्ये एकाच सामन्यात सहभाग घेतला होता.


नेमकं काय घडलं होतं? 


बांगलादेशमधील दैनिक 'डेली स्टार'ने त्यावेळी दिलेल्या वृत्तानुसार, तमीम इक्बाल पत्नी आयशा आणि त्याच्या एका वर्षाच्या मुलीसोबत एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. त्यावेळी आयशाने हिजाब परिधान केला होता. हे तिघे हॉटेलमधून बाहेर येताच, काही संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. इतकंच नाही तर त्यांनी तमीमसह त्याच्या कुटुंबावर अॅसिड फेकलं. मात्र सुदैवाने ते अॅसिड  त्यांच्या शरिरापर्यंत न पोहोचल्याने त्यांना इजा झाली नाही. मात्र, त्यानंतर तमीमने सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धेला रामराम केला होता. तमीम हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तमीमने ब्लास्ट कौंटी चॅम्पियनशिपमध्ये एसेक्स कौंटी क्लबकडून एकच टी 20 सामना खेळला होता.


तमीम इक्बालची डोळे दीपवणारी कारकीर्द


तमिम इक्बालने 70 कसोटी सामन्यांमध्ये 38.89 च्या सरासरीने 5134 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर 243 एकदिवसीय क्रिकेटमध्ये  8357 धावा आहेत. तमिमने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 14 शतके आणि 56 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 24.08 च्या सरासरीने 1758 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि सात अर्धशतकं आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


IPL 2025: कुलदीपला पहिले धक्का दिला, मग क्रीजबाहेर पडताच रनआऊट केले; पंतच्या कृतीकडे अंपायरही पाहत बसले, VIDEO