BCCI Treasurer Ashish Shelar : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची काही दिवसांपूर्वी बीसीसीआय खजिनदार म्हणून नियुक्ती झाली. आधी ते एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार होते, पण त्यानंतर शेलारांनी बीसीसीआयचे खजिनदार म्हणून अर्ज भरला आणि त्यांची नियुक्ती झाली. ज्यानंतर आता बीसीसीआयनं शेलारांवर आणखी एक जबाबदारी सोपवली असून त्यांना जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. शेलारांसह बीसीसीआयचे सहसचिव देवजित साइकिया यांना बिहार क्रिकेट असोसिएशनचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
मागील काही दिवसांत आशिष शेलार यांचं नाव क्रिकेट जगतात सातत्यानं पुढं येताना दिसत आहे. आधी आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरणार होते. शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल एकत्रितपणे मैदानात उतरल्याने शेलार हेच एमसीए अध्यक्ष होतील, असं म्हटलं जात होतं. पण नंतक बीसीसीआय खजिनदार म्हणून शेलाराचं नाव पुढे आलं. खजिनदार पदासाठी शेलारांनी अर्ज भरला असल्याचं बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी सांगतिलं. त्यानंतर शेलार खजिनदार म्हणून नियक्तही झाले. ज्यानंतर आता त्यांना आणखी एक जबाबदारी बीसीसीआयनं दिली आहे.
कशी आहे नवीन बीसीसीआय?
भारताच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची भारतीय नियामक मंडळाच्या अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. तर, राजीव शुक्ला (Rajiv Shukla) बीसीआयच्या अध्यक्षपदी कायम आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदाची सुत्रे हाती घेतले. तसेच रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष ठरले आहेत. रॉजर बिन्नी यांच्याकडंच बीसीसीआयच्या अध्यक्षपदांची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं जवळपास निश्चित होतं. केवळ औपचारिकता म्हणून बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. याशिवाय खजिनदार म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती झाली.
हे देखील वाचा-