Bangladesh Announce Squad ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे सर्व देशांनी त्यांचे संघ जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर आता बांगलादेशनेही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. बांगलादेशने नझमुल हसन शांतोला त्यांच्या संघाचा कर्णधार बनवले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्लाह यांनी संघात स्थान मिळाले.


परंतु संघाचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला संघात स्थान देण्यात आलेले नाही. कारण शाकिब अल हसनच्या गोलंदाजी अॅक्शनवर नुकतीच चेन्नईमध्ये चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये तो नापास झाला. ज्यामुळे संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनमुळे शाकिबवर बंदी घालण्यात आली. कदाचित त्याला निवड न करण्यामागे हेच मोठे कारण असावे. तथापि, आणखी एक उत्कृष्ट अष्टपैलू महमदुल्लाहला संघात निश्चितच स्थान मिळाले आहे. सौम्या सरकार देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांगलादेश संघाचा भाग आहे. अशा परिस्थितीत संघ संतुलित दिसतो.


संघात शकिब अल हसनची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात उणीव भासू शकते. अलिकडेच, महान फलंदाज तमीम इक्बालनेही निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय लिटन दासलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्ला हे संघातील वरिष्ठ खेळाडू असतील. नझमुल हुसेन शांतो यांना यातून खूप मदत मिळेल.






गेल्या वेळी 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशने सर्वोत्तम कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला. यावेळीही संघ आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. यावेळी संघाला आपला पहिला सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबई येथे खेळला जाईल. यानंतर संघ 24 फेब्रुवारी रोजी रावळपिंडी येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळेल आणि 27 फेब्रुवारी रोजी बांगलादेश संघ यजमान पाकिस्तानशी सामना करेल. हा सामना रावळपिंडीमध्येही खेळला जाईल.


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांगलादेश संघ : नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकीर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजूर, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, नाहिद राणा.


हे ही वाचा -


Virat Kohli and Rohit Sharma : सीनियर खेळाडूंच्या मनमानीला बसणार चाप! BCCIचा महत्त्वाचा निर्णय; रोहित-विराटला मोठा धक्का