Wasim Akram On Babar Azam : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळं आशिया कप 2022 स्पर्धेत भारताने (Asia Cup 2022) विजयी सलामी दिली. या सामन्यावेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) काही चूकीच्या निर्णयांमुळे सामना पाकिस्तानने गमावला असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमनं (Wasim Akram) याने केलं आहे. बाबरकडून नेमकी चूक कुठे झाली याबद्दल देखील वसिमनं आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं. सांगितलं आहे.


सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने आधी गोलंदजी करत 147 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. यावेळी देखील बाबर केवळ 10 धावाच करु शकला. पण मोहम्मद रिझवानच्या 43 आणि इफ्तिकारच्या 28 तसंच दहानीच्या याच्या स्फोटक 16 धावांनी पाकिस्तानने 147 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर 148 धावांचा पाठलाग करताना मात्र भारताची स्थिती 89 वर 4 बाद झाली होती. पाकिस्तानची गोलंदाजी भेदक सुरु होती. पण त्याचवेळी पांड्या-जाडेजा जोडीने अर्धशतकी भागिदारी ठोकत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी बाबरकडून गोलंदाजांची निवड करताना गफलत झाल्याची प्रतिक्रिया वसिमनं दिली. 


मोहम्मद नवाजला अखेरची ओव्हर द्यायला हवी नव्हती - वसिम अक्रम


वसिमने बाबरकडून नेमकी चूक कुठे झाली, याबद्दल सांगताना त्यानेअखेरचं षटक फिरकीपटू मोहम्मद नवाज याला देणं ही बाबरची चूक असल्याचं सांगितलं. अक्रमच्या मते टी20 फॉर्मेटमध्ये अखेरच्या 3 ते 4 ओव्हरमधील कोणतीही ओव्हर फिरकीपटूला देणं म्हणजे धोक्याचं आहे. त्यात समोर जाडेजा-पांड्या सारखे फलंदाज असताना तर आणखीच धोक्याचं असल्याचंही तो म्हणाला. अक्रमच्या मते 13 वी किंवा 14 वी ओव्हर नवाजकडून करुन घेतली हवी होती.   


'मोहम्मद नवाज हुशार गोलंदाज, पण...'


वसिम अक्रमच्या मते मोहम्मद हा एक हुशार गोलंदाज आहे. त्याने आधी विराट आणि त्यानंतर रोहित अशा महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या. पण असं झाल्यावरही त्याला पुढील ओव्हर दिली नाही. हा निर्णय बाबरचा चूकल्याचं अक्रम याचं मत आहे.


हे देखील वाचा-