IND vs PAK : आशिया कप 2018... दिवस होता 19 सप्टेंबर... आणि ठिकाण दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जात होता. आशिया चषक 50 षटकांचा होत होता. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत होता. भारतीय गोलंदाज कमाल फॉर्मात होते. हार्दीक पांड्याही चांगल्या लयीत होता 4.5 ओव्हरमध्ये त्याने केवळ 24 रन दिले होते, पण ओव्हर सुरु असतानाच त्याला अशी काही दुखापत झाली की स्ट्रेचरवरुन त्याला मैदानाबाहेर न्यावं लागलं. त्याची हालत पाहता तो पुन्हा मैदानावर उतरेल आणि आधीसारखा खेळ करेल असं वाटतचं नव्हता. पण रविवारी 28 ऑगस्ट, 2022 रोजी त्याने त्य़ाच मैदानावर त्याच स्पर्धेत आणि त्याच संघाविरुद्ध अशी काही कमाल कामगिरी केली की भारताला थेट विजय मिळवून दिला.


2018 मध्ये दुखापतग्रस्त झालेल्या पांड्याने काही वर्षे संपूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी घेतली आणि यंदा 2022 मध्ये तर तो अशा लयीत दिसतोय की आधी आयपीएल 2022 चा खिताब गुजरातचा कर्णधार होत त्याने जिंकला आणि आता तो भारतीय संघात परतला असून तिथेही कमाल कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याने ज्या मैदानावर दुखापतीमुळे माघार घेतली होती, तिथेच दमदार कामगिरी केल्याने त्याचं आणखीच कौतुक होत आहे.   


हार्दिक पांड्या काय म्हणाला?


"अशा लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्ही नेहमी ओव्हर बाय ओव्हर प्लॅन करता. मला माहित होतं की, समोर एक तरुण गोलंदाज आहे आणि डावखुरा फिरकीपटू देखील आहे. अखेरच्या षटकात माझ्यापेक्षा गोलंदाज जास्त दडपणाखाली असेल. मी जास्त प्रेशर घेतला नाही. आम्हाला शेवटच्या षटकात फक्त 7 धावा हव्या होत्या. एवढंच नव्हे तर, अखरेच्या षटकात 15 धावां काढायच्या असत्या तरीही मी ते केलं असतं. 


भारताचा 5 विकेट्सनी विजय


पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला. यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजन सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाहनं पदार्पणाच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारताच्या दोन फलंदाजांना पव्हेलियनमध्ये धाडलं.  भारताचा पुढील सामना आता 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँग संघाविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे.


हे देखील वाचा-