Babar Azam breaks Virat kohli, Steve Smith Record: गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Galle International Stadium) श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) शतक झळकावून सर्वात जलद 10 हजार धावा ठोकणाऱ्या फलंदाजाच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. या कामगिरीसह त्यानं भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) आणि ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) मागं टाकलंय. 


बाबर आझमच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 10 हजार धावा
बाबर आझमनं 228 आंतरराष्ट्रीय डावात 10 हजार धावांचा टप्पा गाठलाय. याबाबतीत त्यानं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादादचा विक्रम मोडलाय. तर, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथलाही मागं टाकलंय. विराट कोहली आणि स्टीव्हनं 232 डावांमध्ये हा पराक्रम केलाय.


आयसीसी क्रमवारीत बाबरची हवा
आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-20 फलंदाजांच्या यादीत बाबर आझम अव्वल स्थानी आहे. बाबर आझमनं 2015 साली आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर बाबर आझमनं अनेक विक्रमाला गवसणी घातलीय. सध्या बाबर आझम तुफान फॉर्ममध्ये असून त्याची सर्वोत्तम खेळाडूच्या यादीत गणना केली जाते. 


2019 नंतर सर्वाधिक शतक झळकावणार फलंदाज
2019 नंतर सर्वाधिक शतक झळकावणारा बाबर आझम पहिला फलंदाज ठरलाय. या कालावधीत त्यानं 16 शतकं ठोकली आहेत. त्यानंतर जो रूट 16 शतक, रोहित शर्मा 13 शतक आणि जॉनी बेअरेस्टोच्या नावावर 11 शतकांची नोंद आहे.


हे देखील वाचा-