World CUP 2023, Pakistan Cricket Team : भारताविरोधातील सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि पाकिस्तान याच्यातील हायव्होल्टेज सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी या दोन्ही संघामध्ये आमनासामना होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या संघाचा अहमदाबादमध्ये दाखल झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


भारतीय संघ सध्या दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरोधात सामना खेळत आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ दिल्लीवरुन अहमदाबादला रवाना होईल. गुरुवारी भारतीय संघ अहमदाबादला दाखल होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ अहमदाबादमध्ये पोहचला आहे. त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. पाकिस्तान संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढलेला असेल. दोन्ही संघाचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. 


अहमदाबादवरुन पाकिस्तानचा संघ आज दुपारी अहमदाबादमध्ये दाखल झाला. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. बाबर आझम याच्या बॅटमधून अद्याप धावा निघत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानविरोधात किती धावा निघतील, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवारी दुपारी होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. 
 
पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. पाहा व्हिडीओ






पाकिस्तानी पत्रकारांना मिळाला भारताचा व्हिसा -


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादमध्ये (narendra modi stadium) होणार्‍या भारत आणि पाकिस्तान ( India Vs Pakistan ) यांच्यातील सामना कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी पत्रकारांना भारताचा व्हिसा मिळाला आहे. RevSportz  ने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी फक्त पाकिस्तान संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफलाच विश्वचषकासाठी भारताचा व्हिसा मिळाला होता. मात्र आता पत्रकारांनाही व्हिसा मिळाला आहे. RevSportz च्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे 60 पेक्षा जास्त पत्रकार भारत आणि पाकिस्तान सामना कव्हर करण्यासाठी व्हिसा मिळाला आहे. ते अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ((narendra modi stadium)) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कव्हर करण्यासाठी येणार आहेत.


पाकिस्तान दुसऱ्या क्रमाकांकावर - 


न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाने विश्वचषकातील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. पण न्यूझीलंड संघाने दोन्ही सामन्या मोठ्या फरकाने बाजी मारली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. परिणामी चार गुणांसह न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. पहिल्याच सामन्यात 400 धावा चोपणारा दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका संगाचे नेटरनेरट + 2 पेक्षा जास्त आहे.


इंग्लंडच्या विजयचा भारताला फायदा - 



मंगळवारी भारताचा सामना नव्हता, तरीही भारताला गुणतालिकेत फायदा झाला आहे. इंग्लंडने बांगलादेशचा पराभव करत विश्वचषकातील विजयाचे खाते उघडले. बांगलादेशचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघ पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा संघ दोन सामन्यात एक विजय एक पराभवासह पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर विराजमान आहे. बांगलादेश संघालाही एक विजय आणि एक पराभवाचा सामना करावा लागला आहे.