Team India : एकीकडे भारतीय संघाचा स्टार खेळाड केएल राहुल (KL Rahul) अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नबंधनात अडकल असून आता आणखी एक क्रिकेटर बोहल्यावर चढणार आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतच केएल राहुल याचं आथियासोबत लग्न झालं असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत हे दोन्ही खेळाडू टीम इंडियामध्ये नसणार आहेत.


कोण आहे मेहा पटेल? (Meha Patel)


भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा मेहा पटेलसोबत (Meha Patel) विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान जवळपास सर्वच क्रिकेट चाहत्यांना केएल राहुलची पत्नी आथियाबाबत माहिती होती. परंतु, अक्षर पटेलच्या भावी पत्नीला कदाचित फारसे लोक ओळखत नसावे. त्यामुळे अक्षरची भावी पत्नी मेहाबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. अक्षर पटेलची भावी पत्नी मेहा पटेल ही एक प्रोफेशनल डायटीशियन आहे. मेहा पटेलने यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अक्षर पटेलसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. मेहा पटेलने या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय ती डाएटशी संबंधित माहिती देखील शेअर करत असते.


न्यूझीलंड मालिकेत राहुल-अक्षर संघाचा भाग नसतील


आज केएलचं लग्न झाल्यानंतर आता अक्षर पटेलच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असून त्यानंतर टी-20 मालिका खेळणार आहे, परंतु या मालिकेत अक्षर पटेल, केएल राहुलसह संघाचा भाग असणार नाही. सध्या भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 3 वनडे मालिका खेळत आहे. टीम इंडियाने दोन्ही वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. मात्र, या मालिकेतील शेवटचा वनडे शनिवारी खेळवला जाणार.


केएल-अथिया लग्नबंधनात


बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु असलेलं केएल आणि अथिया यांचा विवाह सोहळा आज पार पडला. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.


हे देखील वाचा-