Australia vs New Zealand World Cup 2023 :  रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव केला. 389 धावांचा पराभव करताना न्यूझीलंडकडून कडवी झुंज देण्यात आली. न्यूझीलंडने 50 षटकात 383 धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाने 19 धावांचा यशस्वी बचाव केला. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशेन यांनी जबराट फिल्डिंग करुन जिमी निशीम याला धावा काढण्यापासून रोखले. न्यूझीलंडकडून रचित रविंद्र याने 116 धावांची झंझावती खेळी केली. तर अखेरीस जिमी नीशम याने अर्धशतकी झुंज दिली. ऑस्ट्रेलियाकडून एडम झम्पा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 


ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 389 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. पण ठरावीक अंतराने विकेट गमावल्या.  डेवॉन कॉनवे आणि विल यंग यांनी सात षटकात 61 धावांची सलामी दिली. डेवेन कॉनवे याने 28 धावांचे योगदान दिले. विल यंग 32 धावांवर बाद झाला. रचित रविंद्र याने डॅरेल मिचेल याच्यासोबत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. दोघांनी धावगती कमी होऊ दिली नाही. एकेरी दुहेरी धावसंख्यासोबत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रचिन रविंद्र याजेन 89 चेंडूत 9 चौकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 116 धावा केल्या. डॅरेल मिचेल याने 51 चेंडूत एक षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 54 धावांचे योगदान दिले. कर्णधार टॉम लेथम आणि ग्लेन फिलिप्स यांना मोठी खेळी करता आली नाही. टॉम लेथम याने 22 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. तर हग्लेन फिलिप्स 12 धावांवर बाद झाला. मिचेल सँटनर 17 धावा काढून तंबूत परतला. मॅट हेनरी याला 9 धावा करता आल्या. अष्टपैलू जीमी निशम याने अखेरपर्यंत लढा दिला. नीशम याने 39 चेंडूत तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 58 धावांचे योगदान दिले. ट्रेंट बोल्ट 10 धावांवर नाबाद राहिला. 


ऑस्ट्रेलियाकडून एडम झम्पा याने तीन विकेट घेतल्या. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेल याने एक विकेट घेतली. मिचेल स्टार्क याला एकही विकेट मिळाली नाही. त्याने 9 षटकात 89 धावा खर्च केल्या.


ऑस्ट्रेलियाचा 388 धावांचा डोंगर -


ट्रॅव्हिस हेडनं विश्वचषकातल्या पदार्पणात झळकावलेलं शतक आणि त्यानं डेव्हिड वॉर्नरसोबत दिलेली 175  धावांची सलामी ऑस्ट्रेलियाच्या डावाला धावांची मजबुती देणारी ठरलीय. धर्मशालातल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला विजयासाठी 389 धावांचं आव्हान दिलंय. खरं तर या सामन्यात ऑस्ट्रेलियानं चोविसाव्या षटकांतच दोन विकेट्स गमावून दोनशे धावांचा पल्ला ओलांडला होता. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 49 षटकं आणि दोन चेंडूंत 388 धावांत रोखलं. ट्रॅव्हिस हेडनं 67 चेंडूंत 10 चौकार आणि सात षटकारांसह 109 धावांची खेळी उभारली. डेव्हिड वॉर्नरनं 65 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांसह 81 धावांची खेळी रचली. मग मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिस आणि पॅट कमिन्स यांनी धडाकेबाज फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाच्या डावाला आणखी मजबुती दिली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट आणि ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी तीन, तर मिचेल सॅन्टनरनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.