Nick Hockley: भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कदाचित लवकरच भारत आणि पाकिस्तान तिरंगी मालिकेत एकत्र खेळताना दिसतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निक हॉकली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑस्ट्रेलिया भारत आणि पाकिस्तानसोबत तिरंगी मालिका खेळण्यास इच्छुक आहे. ही मालिका होस्ट करायला आवडेल, असंही त्यांनी म्हटलंय. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. ही मालिका भारतात आयोजित करण्यात आली होती. गेल्या 10 वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळते. 


निक हॉकली काय म्हणाले? 
'वैयक्तिकरित्या मला तिरंगी मालिकेची संकल्पना खूप आवडते. भारत आणि पाकिस्तान सारखे संघ तिरंगी मालिकेत असतील तर आम्हाला अशा मालिकेचे आयोजन करायला आवडेल. भारत आणि पाकिस्तानमधील लोक मोठ्या संख्येनं ऑस्ट्रेलियात राहतात. भारत आणि पाकिस्तान असा एक सामना आहे, जो प्रत्येकालाच पाहायचा आहे. आम्ही अशा संधी प्रदान करण्यात मदत करू शकलो, तर आम्हाला नक्कीच आनंद होईल.


यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमेन रमीज राजा यांनी जानेवारी महिन्यात भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिरंगी मालिकेसाठी प्रस्ताव मांडला होता. मात्र,  त्यानंतर या सामन्यांबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha