Australia beat India 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर सहज विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता, पण टीम इंडिया ही संधी साधू शकली नाही. आता भारताला ही मालिका जिंकायची असेल, तर पुढील तीनही सामने जिंकावे लागतील.

Continues below advertisement

मेलबर्नमध्ये थांबला 17 वर्षांचा विजय रथ

Continues below advertisement

या सामन्यापूर्वी भारतीय संघाने मेलबर्नच्या ऐतिहासिक MCG मैदानावर एकूण 6 टी-20 सामने खेळले होते, ज्यापैकी 4 मध्ये विजय मिळवला होता आणि फक्त एकदाच पराभव पत्करला होता तोही 2008 साली. त्यानंतर 17 वर्षांपर्यंत भारत या मैदानावर अपराजित राहिला होता, पण अखेर हा विजय रथ थांबला.

ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी दमदार विजय 

भारताने दिलेल्या 126 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने झंझावाती सुरुवात केली आणि फक्त 13.2 षटकांत विजय मिळवला. कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मार्श 26 चेंडूत 46 धावा करून बाद झाला, तर हेड 15 चेंडूत 28 धावा करून माघारी परतला. जोश इंग्लिस (20), टिम डेविड (1), मिचेल ओव्हन (14) आणि मॅथ्यू शॉर्ट (0) यांचेही विकेट्स भारताने घेतले. जसप्रीत बुमराहने एका षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. शेवटी मार्कस स्टोइनिसने 6 चेंडूत 6 धावा करत 13.2 षटकांत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात अत्यंत निराशाजनक फलंदाजी केली. केवळ दोन फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले. अभिषेक शर्मा (68) आणि हर्षित राणा (35) या दोघांच्या जोरावरच भारताने 125 धावांपर्यंत मजल मारली. पॉवरप्लेमध्ये भारताने केवळ 40 धावांत 4 गडी गमावले होते. परिणामी, ऑस्ट्रेलियासमोर 126 धावांचे मामुली लक्ष्य ठेवण्यात आले, जे त्यांनी सहज पूर्ण केले.

हे ही वाचा - 

India A vs South Africa A 1st Test Match : 18 वर्षाचा आयुष म्हात्रे चमकला; पडिक्कल, सुदर्शन अन् पाटीदार ठरले फ्लॉप, कर्णधार ऋषभ पंतने काय दिवे लावले?