Ind Vs Aus 2nd T20 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अत्यंत खराब सुरुवात झाली. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने केवळ 40 धावांवर चार गडी गमावले. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने सुरुवातीपासूनच कहर माजवत एकाच षटकात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना माघारी धाडले. टीम इंडियाची अशी खराब सुरूवात टी20 सामन्यांत फार कमी वेळा पाहायला मिळाली आहे.

Continues below advertisement

अभिषेक शर्मा एकटा नटला अन् भारी पण पडला

अभिषेक शर्माने या बिकट परिस्थितीत खऱ्या अर्थाने लढाऊ खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले, तर एकूण टी20 करिअरमधील सहावे. फक्त 23 चेंडूंवर अर्धशतक ठोकत अभिषेकने संयम आणि आक्रमण यांचा सुंदर मिलाफ दाखवला. त्याच्या या खेळीने टीम इंडियाला पुन्हा उभारी मिळवून दिली.

Continues below advertisement

जोश हेजलवूडचा कहर 

जोश हेजलवूडने भारतीय डावाच्या सुरुवातीलाच धक्कादायक मारा केला. त्याने पहिल्या सहा षटकांतच तीन विकेट घेतल्या, ज्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे महत्त्वाचे विकेट्स होते. एक दिवसांच्या मालिकेत जशी हेजलवूडची लय होती, तशीच ती या सामन्यातही कायम राहिली. सूर्यकुमार यादवला त्याने अशा चेंडूवर बाद केले की ज्याला खेळणे जवळपास अशक्यच होते. तर शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांनी घाईघाईत फटकेबाजी करून आपली विकेट गमावली.

गिल आणि तिलक दोघेही अपयशी

शुभमन गिलने मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मिड-ऑफवर मिचेल मार्शच्या हाती सोपा झेल दिला. तिलक वर्माने मात्र एक बेफिकीर फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून थेट विकेटकीपर जोश इंग्लिसकडे गेला. हेजलवूडने आपल्या पहिल्या तीन षटकांत केवळ 6 धावा देत 3 विकेट घेतल्या.

संजू सॅमसनलाही जमले नाही

तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आसेसा संजू सॅमसनला काही विशेष करता आले नाही. नॅथन एलिसने त्याला केवळ 4 चेंडूंवर 2 धावांवर बाद केले. त्यानंतर ऑलराउंडर अक्षर पटेलने अभिषेकसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो 7 धावांवर धावबाद झाला. या विकेटनंतर भारताचा स्कोर 8 षटकांत 50 धावांवर 5 विकेट असा झाला आणि संघ पुन्हा संकटात सापडला.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन -

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन -

मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड.