India A vs South Africa A 1st Test Match : बंगळुरूमध्ये भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यात सध्या अनधिकृत कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघ 309 धावांवर गारद झाला. तनुष कोटियनने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतले आणि तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दुसरीकडे भारताच्या डावाची सुरुवात 18 वर्षांच्या युवा फलंदाजाने जबरदस्त केली. आयुष म्हात्रेने आक्रमक अर्धशतक ठोकत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.

Continues below advertisement

18 वर्षाचा आयुष म्हात्रे चमकला

आयुष म्हात्रेने 76 चेंडूंमध्ये 65 धावांची झळाळती खेळी साकारली, ज्यात त्याने 10 चौकार लगावले. चेन्नई सुपर किंग्सकडून पदार्पण केलेल्या म्हात्रेने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही वनडेप्रमाणे तडाखेबाज फलंदाजी केली. अलीकडेच तो भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार होता आणि आता त्याने ‘अ’ संघातही स्थान मिळवले आहे. मात्र, अनुभवी फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही.

Continues below advertisement

पडिक्कल आणि सुदर्शनची निराशा

देवदत्त पडिक्कलला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोट्यांमध्ये संधी न दिल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु या सामन्यातही तो पहिल्या डावात 22 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा करून बाद झाला. साई सुदर्शनने 94 चेंडू खेळूनही केवळ 32 धावा केल्या.

ऋषभ पंतचा अपयश, रजत पाटीदारही शांत 

कर्णधार ऋषभ पंतवर सर्वांचे लक्ष होते, कारण पायाच्या दुखापतीनंतर त्याची मैदानावर पुनरागमन झाले होते. इंग्लंड दौऱ्यात अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्चरनंतर तो मैदानाबाहेर होता. 14 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उपकर्णधार म्हणून दमदार पुनरागमन करण्याची त्याची इच्छा आहे.

मात्र, या अनधिकृत कसोटी सामन्यात पंतला फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने 20 चेंडूंमध्ये 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा करून झेलबाद झाला. दरम्यान, घरगुती क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून ‘अ’ संघात आलेला रजत पाटीदारही निराश ठरला. त्याने 35 चेंडूंमध्ये एक चौकारासह केवळ 19 धावा केल्या आणि तोही स्वस्तात बाद झाला.

हे ही वाचा - 

Ind vs Aus 2nd T20 : कागदावरचे वाघ मैदानात फेल! अभिषेक शर्मा एकटा नडला अन् भारी पण पडला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं पहिलं अर्धशतक