Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: तुळशीच्या लग्नानंतर धुमधडाक्यात लग्नसराई सुरू होणार आहे. अनेक सेलिब्रिटीही यंदा लग्नाचा बार उडवणार आहेत. अशातच सर्वांच्या नजरा खिळल्यात, त्या क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नसोहळ्यावर. दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल (Smriti Mandhana Palash Muchhal) यांना आपल्या रिलेशनशिपबाबत उघडपणे सांगितलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून दोघांच्या लग्नाच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. पण, वर्ल्डकपनंतर दोघेही लग्नाचा बार उडवणार असून तशी तयारीही सुरू झाली आहे. दोघांच्याही घरी लग्नसराई सुरू आहे. 

Continues below advertisement

सध्या चर्चा रंगलीय की, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छाल आपली लग्नगाठ कुठे बांधणार? मीडिया रिपोर्टनुसार, वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात स्मृती मानधना आणि पलाश मु्च्छल यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. तसेच, 20 नोव्हेंबरपासून दोघांच्या लग्नसमारंभांना सुरुवात होईल आणि हा विवाह स्मृतीच्या घरी म्हणजेच, सांगलीत होणार आहे. आता सांगलीत का? असा प्रश्न सर्वांना पडलाय. तर, स्मृती मानधना दोन वर्षांची असल्यापासून सांगलीत राहतेय. सांगलीतील माधवनगर या उपनगरात स्मृती राहातेय. तिचं शालेय शिक्षणंही तिथंच पार पडलंय. 

स्मृती लवकरच इंदूरची सून होईल: पलाश मुच्छल 

पलाश मु्च्छल त्याचा आगामी चित्रपट 'राजू बाजेवाला' च्या शूटिंगसाठी इंदूरमध्ये दाखल झालेला, त्यावेळी त्यानं तिथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भारतीय संघाच्या सामन्याशी आणि मानधनाशी संबंधित प्रश्नांबाबत पलाश म्हणाला की, स्मृती लवकरच इंदूरची सून होईल. 

Continues below advertisement

स्मृती मानधना, पलाश मु्च्छल लवकरच लग्नाच्या बेडीत 

स्मृती मानधना आणि पलाश मु्च्छल यांच्या रिलेशनशिपबाबत बोलायचं झालं तर, दोघेही 2019 पासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांनी जुलै 2024 मध्ये त्यांच्या नात्याला इंस्टाग्रामवर अधिकृत केलेलं. नुकतंच एका मुलाखतीत बोलताना पलाशनं लवकरच स्मृती इंदूरची सून होणार असल्याचं जाहीर केलेलं. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाबाबत चर्चा रंगल्या आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Smriti Mandhana: टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!