Australia vs New Zealand World Cup 2023 : थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा अवघ्या पाच धावांनी पराभव केला. धरमशालाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावांचा डोंगर उभारला होता. न्यूझीलंडनेही या आव्हानाचा पाठलाग करताना कडवी झुंज दिली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच धावांनी विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशन याने उत्कृष्ट फिल्डिंग करत न्यूझीलंडला रोखले.
न्यूझीलंडला अखेरच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज होती. मैदानावर जिमी नीशम आणि ट्रेंट बोल्ट होते, तर चेंडू मिचेल स्टार्क याच्या हातात होता. जिमी निशम सेट झालेला होता, त्यामुळे सामन्यात रंगत वाढली होती. पण मॅक्सवेल आणि मार्नस लाबूशेन यांनी सीमीरेषावर उत्कृष्ट फिल्डिंग करत चौकार अडवले. त्याशिवाय लाबुशेन याच्या जबराट थ्रोनंतर जम बसलेला नीशम तंबूत परतला अन् ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.
अखेरच्या षटकात नेमकं काय झालं ?
न्यूझीलंडला विजयासाठी 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज होती. स्ट्राईकवर ट्रेंट बोल्ट होता, तर स्टार्क गोलंदाजी करत होता. सामन्यात स्टार्क महागडा ठरला होता, त्यामुळे दबावात होता.
49.1 - स्टार्कच्या पहिल्या चेंडूवर ट्रेंट बोल्ट याने एक धाव घेतली.
49.2 - 5 चेंडूत विजयासाठी 18 धावांची गरज होती. स्टार्क याने नीशम याला लेग साईडला वाईड चेंटू टाकला.. हा चेंडू विकेटकीपर जॉश इंग्लिंश यालाही अडवता आला नाही. त्यामुळे त्या चेंडूवर न्यूझीलंडला पाच धावा मिळाल्या.
49.2 - स्टार्कने वाईड फेकल्यामुळे न्यूझीलंडला पाच चेंडूत आता 13 धावा करण्याची गरज होती. स्टार्क याने टाकलेला चेंडू नीशम याने डीप मिड विकेटला मारला..
49.3 - तीन चेंडूत 11 धावांची गरज होती. नीशम याने चौकार मारण्यासाठी जोरदार फटका मारला. स्ट्रेटला मारलेला हा फटका मॅक्सवेल याने अडवला. मॅक्सवेलच्या जबराट फिल्डिंगमुळे चौकार गेला नाही. नीशमला दोन धावांवर समाधान मानावे लागले.
49.4 - स्टार्कचा चेंडू नीशम याने मिड विकेटला मारला.. यावेळी लाबुशेन याने जबराट फिल्डिंग केली. नीशम याला फक्त दोन धावा घेता आल्या.
49.5 - स्टार्कने टाकलेला फुलटॉस जोरात मारला पण लाबुशेन याने पुन्हा चपळ फिल्डिंग केली. यावेळी दुसरी धाव घेणाऱ्या नीशम हा धावबाद झाला. लाबुशेन याने चेंडू अडवून जॉश इंग्लिंशकडे फेकला अन् धावबाद केले. नीशम बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.
49.6 - अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 6 धावांची गरज होती. लॉकी फर्गुसन याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सर्कलच्या बाहेर गेला नाही. ऑस्ट्रेलियाचा पाच धावांनी विजय झाला.