India Women vs Malaysia Women, Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली. आज मलेशिया संघाविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला. सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारत आणि मलेशिया यांच्यातील सामन्यात पावसाने हजेरी लावली होती.  त्यामुळे सामना १५-१५ षटकांचा करण्यात आला.


पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात १७३ धावांचा डोंगर उभरला होता. पण मलेशियाच्या फलंदाजीवेळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. दोन चेंडू पडल्यानंतर सुरु झालेला पाऊस थांबला नाही. पाऊस न थांबल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता टीम इंडिया 24 सप्टेंबरला सेमीफायनल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.


शेफाली वर्मा आणि जेमिमा रोड्रिगेजची दमदार फलंलदाजी 


मलेशियाविरुद्ध सामना पावसाने प्रभावित झाला. पण शेफाली वर्मा आणि जेमिमा यांनी दमदार फलंदाजी केली. भारतीय महिला संघाची प्रथम फलंदाजी होती. कर्णधार स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. मंधाना 16 चेंडूत 27 धावांची खेळी करून तंबूत परतले. 


तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली स्टार खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्जने एका बाजूने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. शेफाली वर्माही सातत्याने आक्रमक फलंदाजी केली.  या दोघींमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 86 धावांची भागीदारी झाली. या सामन्यात शेफाली वर्मा 39 चेंडूत 67 धावांची उत्कृष्ट खेळी केली.  शेफाली बाद झाल्यानंत जेमिमाला ऋचा घोषची साथ लाभली.  तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये 12 चेंडूत 30 धावांची भागीदारी झाली. टीम इंडियाने 15 षटकात 2 गडी गमावून 173 धावांपर्यंत मजल मारली. जेमिमाने 29 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या तर रिचानेही 7 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी केली.