world cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. गल्ली पासून ते दिल्ली अन् जगभरातील क्रिकेट चाहते क्रिकेटच्या महाकुंभासाठी उत्सुक आहेत. विश्चषकाआधी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे.  क्रिकेटच्या रनसंग्रामाला पाच ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघाची नवी कोरी जर्सी लाँच करण्यात आली आहे. 


टीम इंडियाचा किट स्पॉन्सर आदिदास या कंपनीने टीम इंडियाची जर्सी लाँच केली आहे. आदिदासने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरुन जर्सी लाँचचा व्हिडिओ पोस्ट केलाय.  भारतीय संघाची नवीन जर्सी पाहून चाहतेही खुश झालेत. या नव्या जर्सीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली याच्यासह इतर खेळाडूंचा हटके स्वॅग दिसत आहे. 


आदिदास (Adidas) कंपनीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात भारताचा प्रसिद्ध गायक रफ्तार याने ‘तीन का ड्रीम’ (3 Ka Dream) हे गाणे गायले आहे. यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), शुभमन गिल, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांसारखे स्टार खेळाडू नवीन जर्सीत दिसत आहेत. भारताचे चाहते तिसऱ्या वनडे विश्वचषक किताबाची वाट पाहत आहेत. त्यामुळेच ‘तीन का ड्रीम’ हे गाणे तयार करण्यात आलेय.  


आदिदास कंपनीने टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल केला आहे. विश्वचषकासाठी ही खास जर्सी तयार करण्यात आली.  ही जर्सी अतिशय आकर्षक आहे. सध्याच्या जर्सीपेक्षा नव्या जर्सीमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. नवीन जर्सीत खांद्यावर तीन पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी भारतीय ध्वजातील तीन रंग (केशरी, पांढरा आणि हिरवा) ठेवले आहेत. तसेच, जर्सीच्या छातीच्या उजवीकडे बीसीसीआयचा लोगो आणि दोन स्टारही आहेत. हे दोन स्टार भारतीय संघाचा दोन वनडे विश्वचषक 1983 आणि 2011चा विजय दर्शवतात.


पाहा व्हिडीओ














क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला पाच ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. भारताच्या अभियानाची सुरुवात भारतीय संघ 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे होणार आहे. त्याआधी वनडे विश्वचषकाचे अँथेम साँग अधिकृतरीत्या रिलीज करण्यात आले आहे. ‘दिल जश्न बोले’ असे अँथेम साँगचे नाव आहे.  यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. या गाण्याला बॉलिवूडचा प्रसिद्ध कंपोजर प्रीतम याने संगीत दिले आहे.