Asian Games 2023 India vs Nepal : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उप उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फंलदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 202 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर नेपाळला 179 धावांमध्ये रोखले. भारताकडून यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळी केली. तर गोलंदाजीत रवि बिश्नोई याने तीन विकेट घेतल्या.


भारताने दिलेल्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळने दमदार सुरुवात केली. नेपाळने 10 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 76 धावांपर्यंत मजल मारली होती. पण फिरकी गोलंदाजी सुरु झाल्यानंतर नेपाळचे फलंदाज ढेपाळले. एकापाठोपाठ एक ठराविकअंतराने विकेट फेकल्या. नेपाळकडून सलामी फलंदाज कौशल याने 32 चेंडूत एक षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 28 धावा जोडल्या. आसिस शेख याने 10 धावांचे योगदान दिले. कौशल मल्ला याने 22 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 29 धावा चोपल्या. कर्णधार रोहित पी अपयशी ठरला. रवि बिश्नोईच्या चेंडूवर रोहित अवघ्या तीन धावा काढून तंबूत परतला. 


दीपेंद्र सिंह आमि सुंदीप जोरा यांनी वेगाने धावा करत प्रत्युत्तर दिले. पण त्यांना मोठी केळी करता आली नाही. दीपेंद्र सिंह याने 15 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. तर सुंदीप जोरा याने 12 चेंडूत तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 29 धावांचे योगदान दिले. दीपेंद्रला रवि बिश्नोईने तंबूत धाडले तर सुंदीपला अर्शदीपने बाद केले. सोमपाल कामी सात धावा काढून आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. गुलसन झा याला सहा धावांवर अर्शधीपने तंबूत धाडले. 


भारताकडून रवि बिश्नोई याने 4 षटकात 24 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. रवि बिश्नोईच्या चेंडूवर एकही षटकार गेला नाही. भारताच्या इतर सर्व गोलंदाजांना एकतरी षटकार मारला आहे. अर्शदीप सिंह आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह याने 4 षटकात 43 धावा खर्च केल्या. आवेश खान याने 4 षटकात 32 धावा दिल्या. साई किशोर याने 4 षटकात 25 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. वॉशिंगटन सुंदर याने एका षटकात 11 धावा खर्च केल्या. तर शिवम दुबे याने तीन षटकात 37 धावा खर्च केल्या.