Team India At World Cup : यजमान भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात चेन्नईच्या मैदानातून आस्ट्रेलियाविरोधात होत आहे. आठ ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय. मागील 12 वर्षांपासून भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. टीम इंडिया घरच्या मैदानावर विश्वचषक विजयासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत सध्या अव्वल स्थानाववर आहे. भारताने नुकतेच आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 2-1 च्या फरकाने मात दिली होती. भारतीय संघातील खेळाडूही सध्या तुपान फॉर्मात आहेत. टीम इंडियाकडून यंदाचा विश्वचषक विजयाची आशा असेल. पण आतापर्यंतच्या 12 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली.. टीम इंडियाचे वेळापत्रक काय आहे... याबाबत जाणून घेऊयात...
विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा अव्वल स्थानावर...
रनमशीन विराट कोहली भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विश्वचषकातील भारतीय खेळाडूमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. विराट कोहलीने वनडेमध्ये 13083 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने 57.38 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 47 शतकांची नोंद आहे. त्याशिवाय 66 अर्धशतके ठोकली आहेत. विराट कोहलीने विश्वचषकात एक हजार पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. गोलंदाजीबाबत विचार केल्यास रविंद्र जाडेजा वनडेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. रविंद्र जाडेजाने 204 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात खेळत असलेल्या भारतीय गोलंदाजात रविंद्र जाडेजा यशस्वी गोलंदाज आहे. जाडेजाने आतापर्यंत 202 विकेट घेतल्या आहेत.
वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचे वेळापत्रक -
8 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर: भारत विरुद्ध अफगानिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर: भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर: भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर: भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका, कोलकाता
12 नोव्हेंबर: भारत विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरु
आतापर्यंतच्या 12 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली? कोणत्या वर्ल्डकपमध्ये भारत कुठपर्यंत पोहचला?
1975: ग्रुप स्टेज
1979: ग्रुप स्टेज
1983: विश्वविजेता
1987: सेमीफायनल
1992: राउंड-रॉबिन स्टेज
1996: सेमीफायनल
1999: सुपर सिक्स
2003: उपविजेता
2007: ग्रुप स्टेज
2011: विश्वविजेता
2015: सेमीफायनल
वर्ल्ड कपसाठी भारतीय शिलेदार -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव