Asian Games 2023 Cricket Schedule : चीनमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई स्पर्धेत क्रिकेटचाही सहभाग आहे. यामध्ये भारतीय संघाने महिला आणि पुरुष संघाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची चांगली क्रमवारी असल्यामुळे थेट क्वार्टर फायनलचे तिकिट मिळाले आहे. बीसीसीआयने महिला आणि पुरुष दोन्ही संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाची धुरा ऋतुराजच्या हातात आहे तर महिला संघाचे नेतृत्वा हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. 


भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर 2 सामन्यांच्या बंदी आहे. त्यामुळे टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली तरच हरमनप्रीतला खेळण्याची संधी मिळणार आहे. १९ व्या आशियाई स्पर्धेत महिला क्रिकेट सामन्याची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होत आहे, अंतिम सामना २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. पुरुष संघाच्या स्पर्धेची सुरुवात २८ सप्टेंबर ते सात ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे.


कुठे होणार स्पर्धा -  


19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले आहेत.   सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंडवर खेळले जातील.


एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार ? 


आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व कार्यक्रमांचे भारतामध्ये थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. यामध्ये, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनल असेल, तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग असेल. 


भारतीय पुरुष टीम : 
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जायसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर).


राखीव खेळाडू : यश ठाकुर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन.


भारतीय महिला टीम : 
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तितास साधु, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणि, कनिका आहूजा, उमा छेत्री (विकेटकीपर), अनुषा बरेड्डी.


राखीव खेळाडू : हरलीन देयोल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर.


स्पर्धेचे वेळापत्रक - 


महिला क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक


19 सप्टेंबर – हाँगकाँग विरुद्ध चीन, राउंड 1, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


19 सप्टेंबर – नेपाळ विरुद्ध सिंगापुर, राउंड 1, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


20 सप्टेंबर – इंडोनेशिया विरुद्ध मलेशिया, राउंड 1, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


20 सप्टेंबर – विनर ऑफ मॅच 1 विरुद्ध दुसऱ्या सामन्याचा विजेता, राउंड 1, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


21 सप्टेंबर – यूएई विरुद्ध भूटान, राउंड 1, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


21 सप्टेंबर – थाईलँड विरुद्ध ओमान, राउंड 1, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


22 सप्टेंबर – भारत विरुद्ध चौथ्या सामन्याचा विजेता, क्वार्टर फायनल 1, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


22 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध तिसऱ्या सामन्याचा विजेता टीम, क्वार्टर फायनल 2, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


24 सप्टेंबर – तिसरा संघ विरुद्ध चौथा संघ, क्वार्टर फायनल 3, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


24 सप्टेंबर – चौथा आणि पाचव्या सामन्यातील विजेते  क्वार्टर फायनल 4, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


25 सप्टेंबर – पहला सेमीफायनल, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


25 सप्टेंबर – दूसरा सेमीफायनल, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


26 सप्टेंबर – कांस्य पदक सामना, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


26 सप्टेंबर – फायनल सामना (गोल्ड मेडल ) भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


एशियन गेम्स 2023 पुरुष संघाचे संपूर्ण वेळापत्रक


28 सप्टेंबर – ओमान विरुद्ध सऊदी अरेबिया, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


28 सप्टेंबर – हाँगकाँग विरुद्ध सिंगापुर, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


29 सप्टेंबर – मलेशिया विरुद्ध बहरीन, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


29 सप्टेंबर – नेपाळ विरुद्ध इंडोनेशिया, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


30 सप्टेंबर – कतर विरुद्ध कुवैत, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


30 सप्टेंबर – यूएई विरुद्ध भूटान, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


1 ऑक्टोबर – अफगानिस्तान विरुद्ध चीन, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


1 ऑक्टोबर – पहिल्या सामन्यातील विजेता विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


2 ऑक्टोबर – तिसऱ्या सामन्यातील विजेता विरुद्ध चौथ्या सामन्यातील विजेता, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


2 ऑक्टोबर – पाचव्या सामन्यातील विजेता विरद्ध सहाव्या सामन्यातील विजेता , भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


4 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध आठव्या सामन्यातील विजेता, क्वार्टर फायनल 1, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


4 ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध नवव्या सामन्यातील विजेता संघ, क्वार्टर फायनल 2, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


5 ऑक्टोबर – बांग्लादेश विरुद्ध दहाव्या सामन्यातील विजेता, क्वार्टर फायनल 3, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


5 ऑक्टोबर – भारत विरुद्ध 7 व्या सामन्यातील विजेता  , क्वार्टर फायनल 4, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


6 ऑक्टोबर – पहिला सेमीफायनल सामना, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


6 ऑक्टोबर – दूसरा सेमीफायनल सामना, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता


7 ऑक्टोबर – कांस्य पदक सामना, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता


7 ऑक्टोबर – फायनल (गोल्ड मेडल ), भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता