Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला संघ आणि श्रीलंकंन महिला संघामध्ये सुवर्णपदकासाठी लढत होत आहे. भारताने बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर पाकिस्तान संघाचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. आज सकाळी कांस्य पदकाच्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला.
भारताची नियमीत कर्णधार हरमनप्रीत कौर हिचे कमबॅक झालेय. हरमनप्रीत कौर हिच्यावर दोन सामन्याची बंदी होती. हरमनप्रीत कौरच्या कमबॅकमुळे भारतीय संघाची ताकद वाढली आहे. हरमनप्रीत कौर हिने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. दरम्यान, टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत रेकॉर्ड चांगला आहे. आशियाई क्रीडा 2023 मध्ये महिला क्रिकेटमध्ये शफाली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तीने 2 डावात 84 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाची प्लेईंग ११
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, तितास साधु, राजेश्वरी गायकवाड
श्रीलंका संघात कोण कोण :
चमारी अटापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), विशमी गुणरत्ने, नीलाक्षी डी सिल्वा, हासिनी परेरा, उदेशिका प्रबोधनी, ओशादी रणसिंघे, इनोका रणवीरा, इनोशी प्रियदर्शनी, कविशा दिलहारी, सुगंधिका कुमारी
भारताच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा 2023 च्या उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना मलेशियाशी झाला. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर उपांत्य फेरीत भारताचा बांगलादेशशी सामना झाला. टीम इंडियाने 8 विकेटने सामना जिंकला. उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने केवळ 51 धावा केल्या. संघ 17.5 षटकांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 8.2 षटकांत 2 गडी गमावून सामना जिंकला.