Ravi Ashwin vs David Warner : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना इंदोर येथील स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारताने ९९ धावांनी विजय मिळवला. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंनी गुडघे टेकले. वॉर्नरचा अपवाद वगळता आघाडीचे सर्व फलंदाज फेल ठरले. डेविड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. डेविड वॉर्नर आणि आर. अश्विन यांच्यातील सामना पाहण्यासारखा होता. अश्विनचा सामना करण्यासाठी डेविड वॉर्नर डाव्याचा उजवा झाला. वॉर्नरने चौकारही मारला. अश्विननेही डेविड वॉर्नरला धडा शिकवला. आर. अश्विनने डेविड वॉर्नरला बाद करत भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. अश्विन आणि वॉर्नर यांच्यातील मैदानावरील संघर्षाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.


सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ


डावखुऱ्या डेव्हिड वॉर्नरने रवी अश्विनला उजव्या हाताने फलंदाजी करत चौकार मारला. त्यानंतर भारतीय ऑफस्पिनरने शानदार पुनरागमन केले. डेव्हिड वॉर्नरला बाद करून रवी अश्विनने बदला घेतला. दोघाती संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत. डेव्हिड वॉर्नरने बाद होण्यापूर्वी 39 चेंडूत 53 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला.


पाहा व्हिडीओ...






 






भारताचा मोठा विजय 


 दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 99  धावांनी विजय मिळवला.  भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार ऑस्ट्रेलियाला ३१७ धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले होते. पण अश्विन-जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 217 धावांत आटोपला. डेविड वॉर्नर आणि सीन एबॉट यांनी अर्धशतके ठोकली. इतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अश्विन-जाडेजा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. या विजयासह तीन सामन्याची मालिका भारताने २-० ने जिंकली आहे. मोहाली आणि इंदौर वनडे सामन्यात भारताने बाजी मारली. अखेरचा सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव संघात परतणार आहेत.