Asia Cup 2023 Team India Squad: आशिया चषकासाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात आली. रोहित शर्माच्या(Rohit Sharma) नेतृत्वातील 17 जणांच्या चमूची निवड करण्यात आली आहे. युवा तिलक वर्मा याला घेत सर्वांनाच सरप्राईज करण्यात आले आहे. त्याशिवाय केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे कमबॅक झालेय. भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना संधी देण्यात आलेली नाही. 

कुलदीप यादव हा भाताचा प्रमुख फिरकी गोलंदाज असेल. त्याच्या जोडीला रविंद्र जाडेजा याचे स्थानही निश्चित आहे. तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून अष्टपैलू अक्षर पटेल याला संधी देण्यात आली आहे. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन या अनुभवी फिरकी गोलंदाजांना आशिया चषकासाठी संधात स्थान मिळालेले नाही. आशिया चषक हा विश्वचषकाची रंगीत तालीम म्हटले जातेय. येथे खेळणाऱ्या संघातील खेळाडूच विश्वचषखात खेळतील. चहल आणि अश्विन यांना संधी दिलेलीनाही. त्यामुळे विश्वचषकात यांचा पत्ता कट झाला, असे ग्राह्य धरले जात आहे.

आशिया चषकाच्या संघ निवडीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनुभवी चहल आणि अश्विन यांना संधी न दिल्यामुळे नेटकऱ्यांनी टीकेची झोड उडवली आहे. दोघांकडेही दांडगा अनुभव आहे. त्यात भारतीय उपखंडात स्पर्धा होत आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळणार, हे निश्चित आहे. तरीही चहल-अश्विन यांना संधी न दिल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झालाय. 

आशिया चषकासाठी भारताचा संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)

30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 

तारीख फेरी सामना ठिकाण कधी होणार सामना
30 ऑगस्ट 2023 1 पाकिस्तान vs नेपाळ मुल्तान, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
31 ऑगस्ट 2023 1 बांगलादेश vs श्रीलंका कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
2 सप्टेंबर 2023 1 पाकिस्तान vs भारत कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
3 सप्टेंबर 2023 1 बांगलादेश vs अफगाणिस्तान  लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
4 सप्टेंबर 2023 1 भारत vs नेपाळ  कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
5 सप्टेंबर 2023 1 श्रीलंका vs अफगाणिस्तान लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
6 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs B2 लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
9 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) B1 vs B2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
10 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs A2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
12 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
14 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs B1  दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
15 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
17 सप्टेंबर 2023  फायनल S4 1 vs S4 2 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता