Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक 2023 च्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा होऊन महिनाभर झाला, पण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. पाकिस्तानच्या भूमिकेमुळे वेळापत्रकाला उशीर होत आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या सहमतीने आशिया चषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, बुधवार, 19 जुलै रोजी आशिया चषकाचे वेळापत्रक जारी होणार आहे. पीसीबीचे चेअरमन जाका अशरफ बुधवारी संध्याकाळी 7.15 वाजता (पाकिस्तानमधील वेळेनुसार) आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करणार आहेत. भारतीय वेळानुसार हे वेळापत्रक रात्री 8.15 वाजता समोर येणार आहे. 31 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दंबुला अथवा कोलंबो या ठिकाणी होणार आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही, त्यामुळेच आशिया चषकाच्या वेळापत्रकाला उशीर झालाय. बीसीसीआय सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जाका अशरफ यांच्यामध्ये डरबन येथे नुकतीच भेट झाली. या भेटीमध्ये आशिया चषक आणि विश्वचषकासंदर्भात चर्चा झाल्याचे समजतेय. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल असणार आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. श्रीलंकामध्ये आशिया चषकाचे 9 सामने होणार आहे तर चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहे.
पीसीबीकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात आशिया चषकासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आशियन क्रिकेट काऊन्सिल आणि पीसीबी यांच्यामध्ये आशिया कप वेळापत्रकासंदर्भात शनिवारी चर्चा झाली. वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय. या आठवड्यात आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे. आशिया चषकाची सुरुवात पाकिस्तानच्या सामन्याने होणार आहे.
कुठे पाहाता येणार सामने?
31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे.
आणखी वाचा :
World Cup आधी 3 वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, पाहा कधी, कुठे होणार लढत?