Rohit Sharma Forget Passport : कॅप्टन रोहित शर्मा विसरभोळा असल्याचं अनेकदा ऐकले आहे. तो नेहमीच काही ना काही विसरत असल्याचे अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं. याचाच दाखला रविवारी मिळाला. रोहित शर्मा कोलंबोतून निघाला त्यावेळी हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरला होता. रोहित शर्मा पासपोर्ट विसरला होता, याबाबत समजताच अनेकांना विराट कोहलीचे ते वक्तव्य आठवले.
२०१७ मध्ये विराट कोहलीने एका मुलाखतीत रोहित शर्माबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये रोहित शर्मा कधी काय विसरेल याचा नेम नाही. रोहित शर्मा काहीही विसरू शकतो, असे विराट म्हणाला होता. दरम्यान, यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला रोहित नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय घ्यायचा, हेच विसरून गेला होता. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने आपला निर्णय घेतला होता. असेच काहीसे आशिया चषक 2023 स्पर्धा संपल्यानंतर रोहितचा ‘गजनी’ अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
पासपोर्ट विसरला रोहित शर्मा
रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताने दमदार विजय मिळवला. भारताने आठव्यांदा चषकावर नाव कोरले. जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाने जल्लोष केला. त्यानंतर मायदेशात रवाना होण्यासाठी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बसमध्ये बसले होते. पण रोहित शर्माला खाली उतरावे लागले. कारण, तो पासपोर्ट विसरला होता. रोहितने सर्वात शेवटी गेला. कारण, तो पासपोर्ट विसरला होता. ज्यावेळी सहकाऱ्यांना हे समजले, तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. रोहित गोंधळलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्याने त्याचा पासपोर्ट आणून दिला. यानंतर बस निघून गेली. रोहितच्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना विराट कोहलीच्या वक्तव्याची आठवण झाली. रोहित शर्मासारखा विसरभोळा पाहिला नसल्याचे विराट म्हणाला. रोहित शर्मा काहीही विसरु शकतो, असे विराटने सांगितले होते. आता विराट कोहलीचा तो व्हिडीओही पुन्हा व्हायरल होतोय. रोहित अनेकदा त्याचा आयपॅड, मोबाईल आणि पासपोर्टही हॉटेलमध्ये विसरतो. एकदा तो त्याच्या लग्नाची अंगठी हॉटेलमध्ये विसरला, असे विराटने सांगितलेले.