Indian Cricket Team's Practice : आशिया चषकाच्या सामन्यात पावसाने अनेकदा खोडा घातला आहे. पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करावा लागला होता. त्याशिवाय नेपाळविरोधातील सामन्याची काही षटके वाया गेली होती. पावसामुळे आशिया चषकातील सामने कोलंबोला शिफ्ट करण्यात आले आहेत. पण मुसळधार पावसाने कोलंबो येथेही हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून कोलंबोमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भारतीय संघाने इनडोअर सराव केला.
केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर यांच्यासह सर्वजण कसून सराव केला आहे. पावसामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी इनडोअर सराव केला. भारताचा आगामी सामना 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव सुरु केला. केएल राहुल यानेही भारतीय संघासोबत सराव केला. हार्दिक पांड्यासोबत त्याने नेट्समध्ये दमदार सराव केला. राहुल याने डावखुऱ्या गोलंदाजाचा सामना केला. केएल राहुल पाकिस्तानविरोधात खेळण्याची शक्यता आहे. इशान किशन याला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
ऐश्चिक सरावामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांनी सहभाग घेतला नाही. शुभमन गिल याने काही वेळ सराव केला. पाकिस्तानविरोधात गिल याला स्विंग चेंडूचा सामना करताना संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे गिल याने स्विंग चेंडूचा सामना केला. शार्दुल ठाकूर याने फलंदाजीचा जोरदार सराव केला. शार्दूल ठाकूर याने राहुल द्रविड याच्याकडून फलंदाजीच्या टिप्स घेतल्या.
भारत आणि पाकिस्तान सामन्यात पुन्हा पाऊस -
Accuweather च्या वृत्तानुसार, रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के इतकी आहे. आशिया चषकात दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल... तर सायंकाळी 80 टक्के पाऊस कोसळू शकतो. Accuweather च्या रिपोर्ट्सनुसार, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.
पाकिस्तानविरोधात भारताची संभाव्य प्लेईंग 11
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज