KL Rahul and Ishan Kishan : आशिया चषकात भारताचा पुढील सामना पाकिस्तानसोबत रविवारी होणार आहे. कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. केएल राहुलच्या पुनरागमनामुळे रोहित शर्मापुढे प्लेईंग 11 चा पेच उभा राहिला आहे. केएल राहुलला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. पण राहुलला संधी दिल्यास कुणाचा पत्ता कट होणार? हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय. 


दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता. पण राहुलच्या कमबॅकमुळे आता इशान किशनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. राहुलच्या अनुपस्थितीत इशान किशन याने पहिल्या दोन्ही सामन्यात विकेटकिपर फलंदाजाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तानविरोधात इशान किशन याने झुंजार 82 धावांची खेळी केली होती. आघाडीचे फलंदाज फेल गेल्यानंतर इशान किशन याने डाव सावरला होता. पण आता इशान किशनला संघात स्थान मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. 


विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुल भारताची पहिली पसंती आहे. त्यामुळे इशान किशनचा पत्ता कट होऊ शकतो. पाकिस्तानविरोधात दमदार फलंदाजी केल्यानंतरही इशान किशन याला बेंचवरच बसावे लागू शकते. 


नेट्समध्ये कसून सराव - 


कमबॅकनंतर केएल राहुल याने कसून सराव सुरु केला आहे. नेट्समध्ये हार्दिक पांड्यासोबत राहुलने फलंदाजीचा सराव केला. आशिया चषकात केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो.. तर हार्दिक पांड्या सहाव्या स्थानावर... राहुलने नेट्समध्ये कसून सराव केला.  






वनडेमध्ये पाकिस्तानविरोधात राहुलची कामगिरी - 


केएल राहुल याने पाकिस्तानविरोधात फक्त एक वनडे सामना खेळला आहे. 2019 च्या विश्वचषकात केएल राहुलने पाकिस्तानविरोधात एकदिवसीय सामना खेळला आहे. या सामन्यात राहुल याने 57 धावांची खेळी केली होती. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. 


केएल राहुल तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचा सदस्य -


केएल राहुल भारतासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत 47 कसोटी, 54 वनडे आणि 72 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये केएल राहुल याने 2642 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये  1986 आणि टी20 मध्ये 2265 धावा केल्या आहेत. 


पाकिस्तानविरोधात भारताची संभाव्य प्लेईंग 11 


शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज