Pakistan vs Sri Lanka, Asia Cup 2023: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये जर कोणत्या गोलंदाजानं आपली दखल घेण्यास भाग पाडलं असेल, तर तो म्हणजे श्रीलंकेचा (Sri Lanka) डावखुरा फिरकी गोलंदाज ड्युनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage). टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात वेल्लालागेनं आपल्या फिरकीच्या जाळ्यात टीम इंडियाचा धुरंधरांनाही अडकवलं होतं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसह वेल्लालागेनं 5 विकेट्स चटकावल्या. त्यानंतर पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यातही वेल्लालागेनं आपल्या फिरकीची जादू दाखवलीच. वेल्लालागेनं या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आपल्या जाळ्यात अडकवलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भल्या भल्या स्पिनर्सना पाणी पाजणारा बाबर आझम वेल्लालाघेच्या जाळ्यात अगदी सहज अडकला अन् माघारी परतला. 


टीम इंडियाविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात शुभमन गिलला ड्युनिथ वेल्लालागेनं स्टंप आऊट केलं. त्याचवेळी त्यानं आपल्या शानदार फिरकीनं रोहित शर्माला त्रिफळाचीत केलं. याशिवाय वेल्लालाघे यानं कोहली आणि हार्दिकलाही आपल्या जाळ्यात खेचलं. त्याचवेळी त्यानं या सामन्यात आपल्या फलंदाजीनंही सर्वांना प्रभावित केलं होतं, ज्यामध्ये एके काळी त्यानं आपल्या खेळीनं सामना खूपच रोमांचक बनवला होता.


वेल्लालागेनं पाकिस्तानच्या विरुद्धच्या सामन्यात वनडे रँकिंगमध्ये पहिलं स्थान काबीज केलं आहे. वेल्लालागेनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आपल्या फिरकीत अडकवलं आणि स्टपिंग करत माघारी धाडलं. बाबरनं या सामन्यात 35 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या आणि वेल्लालागेच्या फिरकीचा शिकार झाला. 






वेल्लालाघेचे आतापर्यंत 10 विकेट्स 


दुनिथ वेल्लालागेनं आशिया चशकात 2023 मध्ये आतापर्यंत 5 सामन्यांत खेळताना 40 ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली आहे. त्यामध्ये त्यानं 17.20 च्या सरासरीनं एकूण 10 विकेट्स आपल्या खिशात घातल्या आहेत. वेल्लालागेनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्यानं 25 च्या सरासरीनं 19 विकेट्स घेतले आहेत. यापैकी टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात वेल्लालागेनं 5 विकेट्स घेतले होते. दुनिथनं एक कसोटी सामनाही खेळला आहे, या सामन्यात दुनिथला एकही विकेट घेता आला नाही. 


पाकिस्तानला नमवत श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये 


आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं (Sri Lanka) पाकिस्तानचा (Pakistan) 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. डीएलएसच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी केवळ 42 षटकांत पूर्ण केलं. संघाच्या या विजयात कुसल मेंडिसनं फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावत 91 धावांची शानदार खेळी केली, तर चारिथ असलंकानंही 49 नाबाद धावा केल्या. आता 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा संघ टीम इंडियाविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत खेळणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Asia Cup 2023, PAK vs SL: श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, मेंडिस-असलंकाची धमाकेदार खेळी, पाकिस्तानचं आव्हान संपलं