IND vs NEP Live Score: आसिफ शेख याचे अर्धशतक आणि सोमपाल कामी याच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर नेपाळने 230 धावसंख्येपर्यंत मजल मारली. आसिफ शेख याने 58 धावांची झुंजार खेळी केली तर सोमपाल कामी याने वादळी 48 धावा कुटल्या. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी 231 धावांचे आव्हान आहे.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नेपाळच्या फलंदाजांनी रोहित शर्माचा निर्णय चुकीचा ठरवला. कौशल भुर्टेल आणि आसिफ शेख यांनी नेपाळला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी 9.5 षटकात 65 धावांची सलामी दिली. कौशल भुर्टेल याने 25 चेंडूत झटपट 38 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. शामी, सिराज आणि हार्दिक यांना विकेट घेण्यात अपयश आल्यानंतर शार्दुल ठाकूर याने भारताला पहिले यश मिळवून दिले. आसिफ शेख याने एका बाजूने संयमी फलंदाजी सुरु ठेवली पण त्याला चांगली साथ मिळाली नाही. नेपाळच्या चार विकेट झटपट गेल्या. भीम शारकी 7, कर्णधार रोहित पौडेल 5, कौशल माल्ला 2 यांना मोठी खेळी करता आली नाही. जी झा, दिपिंदर सिंह आणि सोमपाल कामी यांनी तळाला धावांचा पाऊस पाडला. झा याने 23, दिपिंदर सिंह याने 29 धावांचे मोलाचे योगदान दिले.
मोहम्मद सिराजचा बळी ठरलेल्या गुलशन झाच्या रूपाने 144 धावांवर नेपाळच्या संघाने आपली सहावी विकेट गमावली. येथून सोमपाल कामी आणि दीपेंद्र सिंग अरी यांच्यात 56 चेंडूत 7व्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली. नेपाळला 194 धावांवर सातवा धक्का बसला. यानंतर सोमपालने एका टोकाकडून धावा काढण्याचा वेग कायम ठेवत धावसंख्या 200 च्या पुढे नेली. सोमपाल कामी याने भारताच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 56 चेंडूत 48 धावांची खेळी केली. या खेळीत त्यान दोन षटकार ठोकले. सोमपाल कामी याच्या फलंदाजीमुळेच नेपाळचा संघ 230 धावांपर्यंत पोहचला.संदीम लामिक्षाने धावबाद झाला. नेपाळच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांची दमछाक केली. नेपाळच्या फलंदाजापुढे भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा दिसत नव्हता. त्यात वारंवार पाऊस विघ्न घालत होता. नेपाळच्या फलंदाजीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
भारताकडून मोहम्मद सिराज आणि रविंद्र जाडेजा यांनी भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. कुलदीप यादव याला विकेट मिळाली नाही. मोहम्मद सिराज याने तीन षटके निर्धाव फेकली. तर हार्दिक पांड्याने तीन तर कुलदीप यादव याने दोन षटके निर्धाव फेकली.