Pakistan Asia Cup 2023 Records : आशिया चषकात आतापर्यंत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले आहे. नेपाळ, भारत आणि बांगलादेश संघाविरोधात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला होता. पाकिस्तान संघाने पहिल्या सामन्यात नेपाळचा 238 धावांनी पराभव केला. त्यानंतर बांगलादेशचा सात विकेटने हरवले, भारताविरोधातील सामना रद्द झाला पण त्या सामन्यात वेगवान तिकडीने संपूर्ण संघाला गारद केले. आशिया चषकात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. आघाडीचे तिन्ही गोलंदाज पाकिस्तानचेच आहे. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांच्या माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरते. गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजीतही पाकिस्तानचे फलंदाज आघाडीवर आहेत.


आग ओकणारी गोलंदाजी - 


आशिया चषकात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आहे. सर्वाधिक विकेटमध्ये पाकिस्तानचे तिन्ही गोलंदाज पहिल्या तीन क्रमांकावर आहे. हॅरिस रौफ याने सर्वाधिक नऊ विकेट घेतल्या आहेत. हॅरिस रौफ याने तीन सामन्यात नऊ फलंदाजांची शिकार केला आहे. यादरम्यान त्याने 20 षटके गोलंदाजी केली असून 93 धावा खर्च केल्या.  नसीम शाह दुसऱ्य क्रमांकावर आहे, त्याने सात विकेट घेतल्या आहेत. नसीम शाह याने आशिया चषकात 19.3 षटके गोलंदाजी करत 117 धावा खर्च केल्या आहेत. डावखुरा शाहीन आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाहीन आफ्रिदीने तीन सामन्यात 22 षटकात 104 धावा खर्च करत सात विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक विकेट रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शामी यांनी घेतल्या आहेत. या दोघांच्या नावावर एका सामन्यात तीन तीन विकेट आहेत. 


फलंदाजीचा लेखाजोखा - 


आशिया चषकात सर्वाधिक धावा बांगलादेशच्या मजमुल शंतो याच्या नावावर आहे. शंतो याने दोन सामन्यात 193 धावा चोपल्या आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने तीन सामन्यात 168 धावा केल्या आहेत. मेहंदी हसन याने तीन सामन्यात 117 धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा हार्दिक पांड्याच्या नावावर आहेत. पांड्याने एका सामन्यात 87 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने दोन सामन्यात 85 धावा केल्या आहेत. 


सुपर 4 मध्ये पाकिस्तानची दमदार सुरुवात - 


आशियाच चषकातील सुपर 4 फेरीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान संघाने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा सात विकेटने पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना फक्त 193 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाने हे आव्हान तीन विकेटच्या मोबदल्यात 39.3 षटकात सहज पार केले. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संपूर्ण संघ 193 धावांत तंबूत परतला होता. 10 सप्टेंबरो रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारताविरोधात पाकिस्तानचे गोलंदाज कशी कामगिरी करतात..याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.