Mohammad Naim Viral Video : बांगलादेशचा क्रिकेट मोहम्मद नईम याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धगधगत्या निखाऱ्यावरुन तो चालत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. आशिया चषकासाठी मोहम्मद नईम माईंड ट्रेनरसोबत काम करत आहे. त्यासाठी तो धगधगत्या निखाऱ्यावरुन चालत असल्याचे दिसतेय. मोहम्मद नईमचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

मोहम्मद नईमचा व्हिडीओ व्हायरल -

मोहम्मद नईम याला आशिया चषकासाठी बांगलादेश संघात स्थान दिलेय. आशिया चषकासाठी तो तयारी करत आहे. आशिया चषकासाठी नईम स्वत:ला तयार करत आहे. 
क्रिकेटपटू मोहम्मद नईम (Mohammad Naim) माईंड ट्रेनरसोबत काम करत आहे.  तो माईंड ट्रेनरची मदत घेत आहे. यासोबतच तो आगीच्या धगधगत्या निखाऱ्यांवरून चालतानाही दिसत आहे. नईम आगीच्या निखाऱ्यांवरून चालताचा व्हिडीओ व्हायरल होतोय. आता त्याच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

मोहम्मद नईमची कामगिरी ?

23 वर्षीय मोहम्मद नईम याला आशिया चषकासाठी बांगलादेशने संघात स्थान दिलेय. नईम याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तितकासा अनुभव नाही. नईम याने एक कसोटी, चार वनडे आणि 35 टी20 सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधित्व केलेय. नईम याने कसोटीतील दोन डावात 24 धावा केल्या आहेत. तर वनडेमधील तीन डावात फक्त 10 धावा करता आल्या आहेत. 35 टी 20 सामन्यात नईम याने 815 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. 28 मे 2021 रोजी त्याने अखेरचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर त्याला आशिया चषकासाठी संघात स्थान देण्यात आलेय. 

आशिया चषकासाठी बांगलादेशचा संघ :

शाकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, तंजिद तमीम, नजमुल हुसैन शंटो, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसैन, अफीफ हुसैन , शोरफुल इस्लाम, एबादोत हुसैन, मोहम्मद नईम

30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 

तारीख फेरी सामना ठिकाण कधी होणार सामना
30 ऑगस्ट 2023 1 पाकिस्तान vs नेपाळ मुल्तान, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
31 ऑगस्ट 2023 1 बांगलादेश vs श्रीलंका कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
2 सप्टेंबर 2023 1 पाकिस्तान vs भारत कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
3 सप्टेंबर 2023 1 बांगलादेश vs अफगाणिस्तान  लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
4 सप्टेंबर 2023 1 भारत vs नेपाळ  कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
5 सप्टेंबर 2023 1 श्रीलंका vs अफगाणिस्तान लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
6 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs B2 लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
9 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) B1 vs B2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
10 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs A2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
12 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
14 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs B1  दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
15 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
17 सप्टेंबर 2023  फायनल S4 1 vs S4 2 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता

 कुठे पाहाता येणार सामने?

31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे.