IND vs PAK, T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा सामना खेळला जातोय. जवळपास एक महिन्यापूर्वी आशिया चषकात दोन्ही संघ एकमेकांच्या आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) त्याच्या एका चुकीमुळं टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. त्यावेळी अर्शदीपच्या हातातून झेल सुटला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी खालच्या पातळीवर जाऊन त्याच्यावर टीका केली होती. त्यावेळी अनेकांनी त्याला खलिस्तानीही म्हटलं होतं. मात्र, आजच्या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करून अर्शदीपनं टीकाकऱ्यांना उत्तर दिलंय.
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावातील दुसऱ्या षटकात कर्णधार रोहित शर्मानं चेंडू अर्शदीपच्या हातात सोपवला. कर्णधारानं दाखवलेल्या विश्वासावर अर्शदीप खरा उतरला. त्यानं पहिल्याच षटकात बाबर आझमची विकेट्स घेतली. त्यानंतर आक्रमक फलंदाज मोहम्मद रिझवानलाही मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या सामन्यात बाबरला खातंही उघडता आलं नाही. या उत्कृष्ट कामगिरीनं अर्शदीपनं हे सिद्ध केले आहे की तो एका मोठ्या शर्यतीचा घोडा आहे.
ट्वीट-
अर्शदीपचा जबरदस्त फॉर्म
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यातही अर्शदीपनं चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यात अर्शदीपनं पहिल्या तीन षटकात केवळ 19 धावा दिल्या होत्या आणि तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. शेवटच्या षटकात त्यानं खराब गोलंदाजी केली. पण चार षटकांत त्यानं 32 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपनं घेतलेल्या विकेट्सचे महत्त्व खूप जास्त आहे. त्यानं सुरुवातीला बाबर आणि रिझवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर अर्शदीपनं शेवटच्या षटकांमध्ये घातक ठरलेल्या आसिफ अलीलाही स्वस्तात माघारी धाडलं.
हे देखील वाचा-