IND vs PAK, Team India : टी20 विश्वचषक 2022 (T20 WC 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील शानदार सामना सुरू झाला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) टीम इंडिया एकूण 7 फलंदाज घेऊन मैदानात उतरली आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनंतर कार्तिक पुन्हा टी-20  विश्वचषकात सामना खेळत आहे.

 

भारत सर्वात पहिल्यांदा टी20 विश्वचषक खेळताना 2007 च्या संघात दिनेश कार्तिक होता, त्यानंतर दिनेश कार्तिकने 2010 मध्ये शेवटचा टी-20 विश्वचषक सामना खेळला होता. या सामन्यात तो सलामीला आला. त्याने 12 चेंडूत 13 धावा केल्या. यानंतर त्याला चार विश्वचषकांमध्ये संधी मिळाली नाही. पण आयपीएल 2022 मधील दमदार खेळीच्या जोरावर कार्तिक पुन्हा संघात परतला आहे, आता तो भारताच्या टी20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्ये देखील स्थान मिळवू शकला आहे.

 

कसे आहे पाकिस्तानविरुद्ध भारतीय  संघ?


टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात मेलबर्नच्या मैदानात सामन्याला सुरुवात झाली असून भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. विशेष म्हणजे भारत आज तब्बल 7 फलंदाज घेऊन मैदानात उतरत आहे. पण यामध्ये मोठी गोष्ट म्हणजे स्टार विकेटकीपर ऋषभ पंत हा संघात नसून फिरकीपटू युजवेंद्र चहलला ही विश्रांती देण्यात आली आहे. 





भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.







टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचं रेकॉर्ड


दिनेश कार्तिकने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 57 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29.21 च्या सरासरीने 672 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 146.40 राहिला आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला केवळ एकच अर्धशतक ठोकता आले आहे.


हे देखील वाचा-



IND vs PAK : मौका, मौका! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी तापलं मेलबर्नचं वातावरण, पाहा फॅन्सचे व्हायरल VIDEO