IND vs PAK, T20 Playin 11 : टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात मेलबर्नच्या मैदानात सामन्याला सुरुवात झाली असून भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. विशेष म्हणजे भारत आज तब्बल 7 फलंदाज घेऊन मैदानात उतरत आहे. पण यामध्ये मोठी गोष्ट म्हणजे स्टार विकेटकीपर ऋषभ पंत हा संघात नसून फिरकीपटू युजवेंद्र चहलला ही विश्रांती देण्यात आली आहे.

 

हर्षल पटेलही संघात नसल्याचं दिसून येत आहे. त्यांच्याजागी विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिक, फिरकीपटू म्हणून आश्विन आणि अक्षर पटेल हे संघात आहेत. भारताने प्रथम बोलिंगचा निर्णय़ घेऊन पाकिस्तानला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य लवकर पूर्ण करण्याची रणनीती आखली आहे. तर नेमकी तर नेमकी अंतिम 11 कशी आहे पाहूया... 

कसे आहेत दोन्ही संघ?


भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.


पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.







कसा आहे Pitch Report?


ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा विचार करता या स्टेडियमवर पहिल्या डावाची एकूण सरासरी 139 आहे तर दुसऱ्या डावाची एकूण सरासरी 127 आहे. स्टेडियमवर आतापर्यंत 18 T20 सामने झाले आहेत. स्टेडियमवर आतापर्यंतचा सर्वोच्च संघ 184-4 आहे. खेळपट्टी गोलंदाजांना चांगला बाऊन्स देत असल्याने वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होताना दिसतो. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत स्पिनर्सना अधिक फायदा होत नाही.


हे देखील वाचा-



IND vs PAK : मौका, मौका! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी तापलं मेलबर्नचं वातावरण, पाहा फॅन्सचे व्हायरल VIDEO