नवी दिल्ली : आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपचा (T 20 World Cup) थरार रंगणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडून टी-20  वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत.  प्रत्येकी पाच संघ प्रमाणं चार गटात विभागणी  करण्यात आली आहे. भारत(India), पाकिस्तान, अमेरिका, आयरलँड, कॅनडा या संघांचा गट अ मध्ये समावेश करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपचे सराव सामने सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं मोठं वक्तव्य केलं आहे. 


इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं टी- 20 वर्ल्ड कप 2024 साठी बेस्ट टीम म्हणून भारतीय संघाचं नाव घेतलं आहे. भारतीय संघाकडे चांगले खेळाडू आहे. भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करावा लागला तरी ती टीम मजबूत आहे.  जे टीममध्ये नाहीत त्यांच्याबाबत देखील आपण चर्चा करु शकतो, असं मॉर्गन म्हटला. 


इयॉन मॉर्गननं स्काई स्पोर्टस विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. ही स्पर्धा कठीण असणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनं दोनवेळा विजेतेपद पटकवलं आहे. भारतानं एकदा विजेतेपद मिळवलं आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियानं देखील एकदा विजेतेपद मिळवलेलं आहे. 


टी20 वर्ल्ड कपसाठी एक आठवडा बाकी असताना इयॉन मॉर्गनला कॅरेबियन आणि अमेरिकन वातावरणात तुम्हाला बेस्ट टीम कोणती वाटते असा प्रश्न विचारण्यात आला. यावर इयॉन मॉर्गननं स्पष्टपणे भारतीय टीम फेवरिट असल्याचं म्हटलं. 


टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला दुखापतीचा सामना करावा लागला तरी सर्वात मजबूत टीम भारताची आहे. भारतीय संघाची ताकद, क्षमता, त्यांच्या मजबूत फलंदाजी अविश्वसनीय आहे. टीम इंडियाचे काही खेळाडू गुणवत्ता असून देखील टॉप 15 च्या बाहेर आहेत. 


भारतानं 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर ते एकदाही विजेतेपद मिळवू शकले नाहीत हे पण वास्तव असल्याचं मॉर्गननं म्हटलं. टीम इंडियामध्ये क्वालिटी असून कागदावर देखील ते मजबूत टीम आहेत. भारतीय संघ कोणत्याही संघाला चांगला खेळ करुन पराभूत करु शकतात.  


भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार आहे.  9 जूनला भारत आणि पाकिस्तान अशी हाय व्होल्टेज लढत न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. 12  जूनला भारत आणि अमेरिका तर 15 जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात मॅच होईल.


संबंधित बातम्या : 


Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक अन् नताशाचा मुलगा क्रुणाल पांड्याच्या घरी शिफ्ट?; आधी फोटो अन् आता व्हिडीओची चर्चा


Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाचा प्रश्न; नताशाने दिले 4 शब्दात उत्तर, काय म्हणाली?, पाहा Video