Anushka Sharma First Reaction Virat Kohli Retirement : विराट कोहली आता आपल्या भारताच्या पांढऱ्या जर्सीमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसणार नाही. सोमवारी विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा करून जगभरातील त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्याच्या निर्णयानंतर पत्नी अनुष्का शर्माने एक भावनिक पोस्ट शेअर केली. तिने तिच्या इंस्टाग्रामवर विराटसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही स्टेडियममध्ये दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य आहे.
डोळ्याच्या कडा पाणावणारी अनुष्काची पोस्ट... (Anushka Sharma Instagram Post)
क्रिकेटच्या मैदानावर दोघांचा एकत्र फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले की, तुझे असंख्य रेकॉर्ड्स आणि कारकिर्दीतील माइलस्टोन याविषयी बोलतील. पण, तू कधीही न दाखवलेले अश्रू, खेळाच्या या फॉरमॅटसाठी तुझ्या मनात असलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आहेत.
अनुष्का शर्मा पुढे लिहिते, मला माहितीये या दरम्यान तू काय काय गमावलं आहेस. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तू थोडा समजदार, थोडा अधिक नम्र झालास आणि तुला या सगळ्या प्रवासातून विकसित होताना पाहणं हे माझं भाग्य आहे. मला नेहमीच वाटायचे की तू कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होशील, पण तू नेहमीच तुझ्या मनाचं ऐकलं आहेस आणि म्हणूनच ‘माय लव्ह’ मी एवढंच सांगेन की, तू खेळाच्या या फॉरमॅटमध्ये आज सर्व काही मिळवलं आहेस.”
विराट कोहली काय म्हणाला? ( Virat Kohli Retirement Instagram Post)
कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅगी ब्लू’ प्रथमच परिधान करून आज 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या.
भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळं स्थान असतं. कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा, दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉरमॅट आहे. हा फॉरमॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो, जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो.
या फॉरमॅटपासून दूर जाणं सोपं नाही, पण हा निर्णय आता योग्य वाटतोय. मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलं, पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त; अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळाने मला परत दिलंय.
मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे. या खेळासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय, माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञताच आहे
मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहीन!
हे ही वाचा -