Anaya Bangar : भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर याने लिंग बदलाची शस्त्रक्रिया केल्यानंतर तो चर्चेत आलाय. संजय बांगर यांचा मुलाने आता अनाया म्हणून स्वत:चं ट्रान्सफॉर्मेशन केलंय. दरम्यान, आज (दि.6) अनायाने पहिल्यांदाच साडी नेसली असून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  याआधी सोशल मीडियावर तिने अनेक फोटो पोस्ट केले होते, पण त्यामध्ये एकही साडीतील फोटो नव्हता. आता प्रश्न असा निर्माण होतो की, अनाया बांगरने साडी नेसून कोणाची तरी इच्छा पूर्ण केली आहे का? हा प्रश्न का विचारला जातोय, याचं कारण म्हणजे मागच्या महिन्यात, म्हणजेच 2 जुलै रोजी शेअर केलेल्या एका पोस्टवर तिच्या एका चाहत्याने तिला साडीतील फोटो पोस्ट करण्याची विनंती केली होती. आणि त्या विनंतीनंतर एक महिन्यानंतर, अनाया साडीमधील फोटोसह पुन्हा चर्चेत आली आहे. अनाया बांगरच्या या साडीतील फोटोचा संबंध त्या मागणीशी जोडला जातो, जी एक महिना आधी तिच्या एका फॅनने केली होती. 

अनाया बांगरने नेसली आईची साडी

अनाया बांगरने 6 ऑगस्ट रोजी साडीतील फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबतच तिने त्या साडीविषयी खास गोष्टही सांगितली आहे. ती साडी तिच्या आईची आहे. चाहत्यांनी अनायाच्या पोस्टवरुन लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.  हे नाकारता येणार नाही की अनाया बांगर साडीमध्ये सुंदर दिसत नाही. ती फारच सुंदर दिसते आहे. त्यामुळेच तिच्या एका चाहत्याने तिला “सुंदरी” असं नावही दिलं आहे.

अनाया बांगरची सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेली अनाया बांगर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. मग ते पारंपरिक भारतीय पोशाखात सजणं-सावरणं असो किंवा मेहंदी लावण्याचा क्षण. अनाया बांगरचे सर्वच रूप तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात. मात्र, पहिल्यांदाच ती साडीतील रूपात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Actor Has Appeared In 1000 Films: 28 वर्षात 1000 फिल्म्स, 'या' अभिनेत्यासमोर शाहरुख, सलमान, प्रभास सारेच फेल; नेटवर्थमध्ये तर सुपरस्टार रजनिकांतही मागे

Blockbuster Cinema Of Bollywood: थ्रील, सस्पेन्स अन् क्राईमचा मसाला; 'या' सिनेमातला हिरो कुटुंबाला वाचवण्यासाठी थेट पोलिसांना भिडला, 50 कोटींच्या बजेटमध्ये कमावलेले 146 कोटी