Actor Has Appeared In 1000 Films: सध्या प्रेक्षकांमध्ये कॉमेडी शो, कॉमेडी सिनेमांची (Comedy Movie) प्रचंड मोठी क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. जॉनी लिव्हर (Johny Lever), राजपाल यादव (Rajpal Yadav), परेश रावल (Paresh Rawal) यांसारखे दिग्गज आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण दक्षिणेतील एक सुपरस्टार आहे, ज्यानं केवळ विनोदातच आपला ठसा उमटवला नाही, तर त्यानं तब्बल 1000 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तब्बल 1000 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपल्या नावे एक धमाकेदार रेकॉर्ड रचला आहे. 

Continues below advertisement

आम्ही ज्या कॉमेडी स्टारबाबत सांगत आहोत, त्याचं नाव कन्नेगंती ब्रह्मानंदम. ज्यांना 'ब्रह्मानंदम' म्हणून ओळखलं जातं. हा अभिनेता तेलुगू सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेता आहे. यानं अनोख्या विनोदी शैलीन, उत्तम अभिनयानं  आणि अचूक टायमिंगमुळे लाखो प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. यामुळे तो सर्वात श्रीमंत कॉमेडी स्टार देखील बनला आहे.

ब्रह्मानंदमनं रचलाय धमाकेदार विक्रम 

ब्रह्मानंदम यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. कारण त्यांनी त्यांच्या हयातीत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचे चित्रपट मोजले तर, आजवर त्यांनी तब्बल 1000 पेक्षा जास्त आहेत, जी भारतीय सिनेसृष्टीतली एक अभूतपूर्व कामगिरी आहे. त्यानं हा विक्रम फक्त 28 वर्षात साध्य केला, जो त्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि लोकप्रियतेचा जिवंत पुरावा आहे.

Continues below advertisement

एका रात्रीत नशीब चमकलं, बनले सुपरस्टार 

ब्रह्मानंदम यांच्या फिल्मी करिअरबाबत बोलायचं झालं तर, 1987 मध्ये फिल्म 'आहा ना पेल्लांटा'मधून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. या फिल्ममध्ये त्यांना रातोरात स्टार बनवलं होतं. यानंतर त्यांनी 1990 आणि 2000 च्या दशकातील सुरुवातीच्या वर्षांत तेलुगु सिनेमांमध्ये खूप नाव कमावलं. विवाह भोजानमबु (1988), जगदेका वीरुडु अतिलोका सुंदरी (1990), हॅलो ब्रदर (1994), मनमधुडु (2002), धी (2007), रेडी (2008), दूकुडु (2011), रेस गुर्रम (2014) यांसारख्या सिनेमांचा समावेश होतो. 

मीम्सचा बादशाह, ब्रह्मानंदम

ब्रह्मानंदम यांनी तमिळ, हिंदी आणि कन्नड फिल्म्समधून आपली छाप सोडली. पण, त्यांना नाव मिळवून दिलं ते, तेलुगु सिनेमानं. त्यांच्या कॉमेडी आणि अभिनयामुळे त्यांना 'हास्य ब्रह्मा' आणि 'मीम्सचा देव' म्हणून ओळखलं जातं. ब्रह्मानंदम यांना 2009 साली पद्मश्री प्रदान करण्यात आला. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारकडून दिला जाणारा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, तेलुगू चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सहा नंदी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारासाठी दोन फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारासाठी सहा सिनेएमएए पुरस्कार, सर्वाधिक चित्रपटांमध्ये अभिनय केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि आचार्य नागार्जुन विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

ब्रह्मानंदम सर्वात महागडा, कॉमेडियन 

ब्रह्मानंदम हे भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक आहेतच, पण ते सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त (सुमारे 60 दशलक्ष डॉलर्स) आहे. ही रक्कम त्यांना रणबीर कपूर, प्रभास आणि कपिल शर्मा सारख्या अनेक मोठ्या स्टार्सपेक्षाही श्रीमंत ठरवते. ब्रह्मानंदम अगदी छोट्या भूमिका किंवा कॅमिओसाठीही 1-2 कोटी रुपये घेतात. याशिवाय, ते जाहिराती आणि ब्रँडसाठीही मोठं मानधन घेतात. ते निर्माता, स्टेज परफॉर्मर आणि रिअॅलिटी टीव्ही शो होस्ट म्हणूनही काम करतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Blockbuster Cinema Of Bollywood: थ्रील, सस्पेन्स अन् क्राईमचा मसाला; 'या' सिनेमातला हिरो कुटुंबाला वाचवण्यासाठी थेट पोलिसांना भिडला, 50 कोटींच्या बजेटमध्ये कमावलेले 146 कोटी