मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकडे चिरंजिव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या संगीत सोहळ्यात नीता अंबानी (Nita Ambani) आणि मुकेश अंबानी यांनी टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजेता टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासोबत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इतर खेळाडूंचं जोरदार स्वागत केले. संगीत सोहळ्यात नीता अंबानी यांनी रोहित, सूर्या आणि हार्दिकला स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मानही केला. 


रोहित, पांड्या आणि सूर्यकुमारचा खास सत्कार


टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या शानदार विजयामुळे संपूर्ण देशात अजूनही जल्लोषाचे वातावरण आहे. अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्याला टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाची कामगिरी बजावणारे तीन प्रमुख खेळाडू रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनीही हजेरी लावली. यावेळी तिघांचेही भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी नीता अंबानी यांनी तिन्ही खेळाडूंना मंचावर बोलावून टीम इंडियाचा विजय साजरा केला. 


अंबानी कुटुंबाने साजरा केला टीम इंडियाचा विजय


भारतीय संघाने 17 वर्षांनंतर विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये अजूनही जल्लोषाचं वातावरण कायम आहे. बार्बाडोस येथे झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आणि 11 वर्षांनंतर आयसीसी विजेतेपद पटकावलं. विजयानंतर मुंबईत परतलेल्या टीम इंडियाची विजय परेड काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने चाहते सहभागी झाले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या या शानदार विजयाचा संपूर्ण देशाने जल्लोष साजरा केला, त्यातच आता अंबानी कुटुंबानेही हा जल्लोष साजरा केला आहे. अंबानी कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा विजय खूप खास पद्धतीने साजरा केला.


अंबानी कुटुंबाकडून टीम इंडियाच्या खेळाडूंचा गौरव


टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अंबानी कुटुंबाकडून एका विशेष पूजेचं आयोजनही करण्यात आलं होतं, ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सर्व खेळाडूंनी पूजा केली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याच्या दिवशी अंबानी कुटुंबाने या विशेष पूजेचे आयोजन केले होते आणि त्यानंतर मंचावर सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला होता. नीता अंबानी यांनी विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांचा मंचावर बोलावून सत्कार केला.


पाहा व्हिडीओ : 






'कठीण काळ टिकत नाही, कठीण लोक टिकतात'


रोहित शर्मा स्टेजवर पोहोचताच कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी उभे राहून जोरात टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. यावेळी नीता भावूक झाल्या आणि त्यांनी रोहितला घट्ट मिठी मारली. शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने घेतलेल्या शानदार झेलचे नीता अंबानी यांनी कौतुक केलं. यावेळी नीता अंबानी यांनी पांड्याचं खास प्रकारे मंचावर स्वागत केलं. यावेळी त्या म्हणाल्या ज्याच्या शेवटच्या ओव्हरने टीम इंडियाच्या झोळीत मॅच टाकली होती, तो उल्लेखनीय खेळाडू हार्दिक, त्याला आयपीएलदरम्यान वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आली नाही. हार्दिकला गोलंदाजी आणि फलंदाजीनेही विशेष साथ दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण विश्वचषकात त्याने त्याच्या कामगिरीने दाखवून दिलं की, कठीण काळ टिकत नाही, कठीण लोक टिकतात. यानंतर त्यांनी हार्दिकला घट्ट मिठी मारली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : डेव्हिड मिलर बाद नव्हता? सूर्यकुमारच्या निर्णायक झेलचा दुसरा अँगल समोर, क्लीन व्हिडीओने बोलती बंद!