IND vs AUS, Delhi Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 132 धावांच्या फरकाने विजय मिळवला. ज्यानंतर आता दोन्ही संघ दुसऱ्या कसोटीसाठी (IND vs AUS 2nd Test) सज्ज झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तब्बल ५ वर्षांनंतर या मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना खेळवला जात आहे. याआधी 2017 मध्ये अरुण जेटली स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता. ज्यामुळे दिल्ली कसोटीसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आताच सर्वच्या सर्व सामन्याचे तिकिट्स विकले गेले आहेत.


दरम्यान दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. दरम्यान दिल्ली कसोटी सामन्याची सर्व तिकिटं विकली गेली आहेत. त्यात या मैदानाची क्षमता सुमारे 40 हजार प्रेक्षकांची आहे, ज्यामध्ये सुमारे 24000 तिकिटे चाहत्यांसाठी उपलब्ध आहेत तर सुमारे 8000 तिकिटे डीडीसीएच्या अधिकाऱ्यांना नियमानुसार वाटली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या सामन्याची उपलब्ध सर्व तिकिटं आताच विकली गेली आहेत तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी सांगितले की, या सामन्याची सर्व तिकिटं विकली गेली आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. याशिवाय दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक लढत नक्कीच पाहायला मिळेल.


दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही शुभमन गिलला बाहेर बसावे लागू शकते, असे मानले जात आहे. कारण शुभमन गिल दुखापतीशी झुंजत आहे. ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचे तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन जवळपास निश्चित झाले आहे. दिल्ली कसोटीत मिचेल स्टार्कचे पुनरागमन झाले तर वेगवान गोलंदाज शॉन बोलँडला बाहेर बसावे लागू शकते. शॉन बोलँडला पहिल्या कसोटी सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. मात्र, भारतीय संघ दिल्ली कसोटी आणि मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी आपला दावा मजबूत करू इच्छितो.


हे देखील वाचा-