Akash Deep Debut: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात आजपासून चौथा कसोटी (4th Test Match) सामना खेळवला जात आहे. आजच्या सामन्या टीम इंडियाची दिग्गजांची मांदियाळी बाहेर आहे. त्यांच्याऐवजी नवख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आजच्या चौथ्या सामन्या टीम इंडियाचं वादळ जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आजच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी आकाश दीपचा संघात समावेश करण्यात आला आहे. आजच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 ठरवणं तसं रोहित शर्मा आणि निवड समितीसाठी अवघडच होतं. अशातच आकाश दीपवर विश्वास टाकत त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आणि आकाश दीप त्या विश्वासावर खरा उतरलाही.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात आकाश दीपला पदार्पणाची संधी मिळाली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला डेब्यू कॅप देऊन टीम इंडियात त्याचं स्वागत केलं. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनानं दाखवलेल्या विश्वासावर आकाश दीपही खरा उतरला. आकाश दीपनं इंग्लंडच्या तीन खेळाडूंना माघारी धाडलं.
पहिला विकेट आकशच्या हातून निसटला
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू झाला. टॉस जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ सर्वात आधी फलंदाजीसाठी मैदानात आला. इंग्लडचे जॅक क्रॉली आणि बेन डकेट ओपनिंगसाठी मैदानात आले. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजनं गोलंदाजी सुरू केली. त्यानंतर डावातील चौथं षटक टाकत असलेल्या आकाश दीपनं चौथ्या चेंडूवर जॅक क्रॉलीला बोल्ड केलं, परंतु पंचांनी तो नो बॉल दिला आणि कसोटीतील पहिला विकेट आकाशच्या हातून निसटला. पण त्यानंतर अवघ्या काही वेळातच आकाशन संधी साधलीच. इंग्लंडला पहिला धक्का बसला, तो डकेटच्या रूपानं. बेन डकेट 11 धावा करून बाद झाला. आकाश दीपनं डावाच्या दहाव्या षटकात पहिला कसोटी बळी घेतला. आकाश दीप एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं एकापाठोपाठ एक अशा तीन दिग्गज खेळाडूंना माघारी धाडलं.
ऑली पोपच्या रूपानं इंग्लंडनं दुसरी विकेट गमावली. डावाच्या 10व्या षटकातील चौथ्या चेंडूवर आकाश दीपनं ऑली पोला खातंही उघडू दिलं नाही आणि शून्यावरच त्याला माघारी धाडलं. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर आकाशनं बेन डकेटला बाद केलं होतं. डकेट आणि पोपनंतर आकाशनं जॅक क्रॉलीलाही माघारी धाडलं. पदार्पणाची कसोटी खेळत असलेल्या आकाश दीपनं तिसरी विकेट घेतली. यावेळी आकाशनं शानदार खेळी करणाऱ्या जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. डावाच्या 12व्या षटकात 57 धावांवर इंग्लंडला तिसरा धक्का बसला.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत युवा खेळाडूंचं पदार्पण
याआधी रजत पाटीदारनं दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं, तर सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनीही तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं. आता आकाश दीपनं चौथ्या कसोटीत पदार्पण केलं आहे.
टीम इंडियाची प्लेईंग 11
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
इंग्लंडची प्लेईंग 11
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन
महत्त्वाच्या इतर बातम्या :