India Playing 11 Vs England, 4th Test Match: इंग्लंड (England) विरोधात रांची कसोटी (Ranchi Test) सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) प्लेईंग इलेव्हन (Playing 11) जाहीर करण्यात आली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यातून टीम इंडियाचा स्टार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर आहे. त्याच्याऐवजी एका नवख्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाच्या रांची कसोटीसाठी वेगवान गोलंदाज आकाश दीपला पदार्पणाची संधी दिली आहे. भारतीय हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आकाश दीपला (Aakash Deep) डेब्यू कॅप दिली. वेगवान गोलंदाज आकाश दीप जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याची जबाबदारी सांभाळणार आहे. 


इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय 


टीम इंडिया विरुद्धच्या इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकून सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात सर्वात आधी गोलंदाजी करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. 


बुमराहऐवजी आकाश दीपला संधी 


इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कोण खेळणार? हा प्रश्न सध्या बीसीसीआयसमोर होता. पण बीसीसीआयला या प्रश्नाचं उत्तर सापडलं आणि ते उत्तर म्हणजे, आकाश दीप. मूळचा बिहारचा असलेला वेगवान गोलंदाज आकाश दीप चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहची जागा घेणार आहे. अलीकडेच त्यानं इंग्लंड लायन्सविरुद्ध आपल्या गोलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. आकाशनं इंग्लंड लायन्सविरुद्धच्या 2 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या होत्या. 


इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत युवा खेळाडूंचं पदार्पण 


याआधी रजत पाटीदारनं दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं, तर सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनीही तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं. आता आकाश दीपनं चौथ्या कसोटीत पदार्पण केलं आहे.


27 वर्षीय आकाश दीपनं त्याच्या प्रथम श्रेणी करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 104 विकेट्स आहेत. त्याची सरासरी 23.58 आहे. एवढंच नाही तर आकाश दीप आयपीएलही खेळला आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.


टीम इंडियाची प्लेईंग 11


यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज


इंग्लंडची प्लेईंग 11


जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IND vs ENG : रांची टेस्टसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल कन्फर्म; बुमराहच्या जागी कोण खेळणार, तिढा सुटणार?